In 2009, Bhoomi Poojan of City Practitioner Konshile was performed in Martyr Memorial area. But still the building is not erected here. esakal
नाशिक

Kranti Din 2023 : हुतात्‍मा स्‍मारकातील अपूर्ण प्रकल्‍पाचा वनवास संपता संपेना!

सकाळ वृत्तसेवा

Kranti Din 2023 : स्‍वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे कायम स्‍मरण राहाण्यासाठी हुतात्‍मा स्‍मारके उभारलेली आहेत. सीबीएसजवळील न्‍यायालयाच्‍या समोरील जागेत उभारलेले असेच स्‍मारक चळवळीचे केंद्र बनले आहे. (kranti din Bhoomi Pooja of City Abhyasika Konshila was done in Martyrs Memorial area but building has not been erected nashik news)

या स्‍मारकात २००९ साली अभ्यासिकेच्‍या इमारतीचा भूमिपूजन सोहळा झालेला असताना, चौदा वर्षांनंतरही इमारत उभी राहिलेली नाही. अभ्यासिकेच्‍या बांधकामाला मुहूर्ताची प्रतीक्षा लागलेली असून, या अपूर्ण प्रकल्‍पाचा वनवास संपायचे नाव घेत नसल्‍याची स्‍थिती आहे. पुढच्या क्रांतिदिनी तरी येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका कार्यान्‍वित होईल, अशी अपेक्षा यानिमित्त व्‍यक्‍त होते आहे.

ब्रिटिशांविरोधात लढा देत देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी हुतात्‍मा झालेल्‍या क्रांतिकारकांचे स्‍मरण क्रांतिदिनी केले जाते. त्‍यांचे कार्य केवळ या दिवसापुरते मर्यादित राहायला नको व त्‍यांच्‍या कार्याची माहिती जनसामान्‍यांपर्यंत पोचविण्यासाठी राज्‍यभर तालुका पातळीवर हुतात्‍मा स्मारके उभारलेली आहेत.

नाशिक शहरातील हुतात्‍मा स्‍मारकातही क्रांतिकारकांची सविस्‍तर माहिती उपलब्‍ध करून दिलेली आहे. गेल्‍या काही वर्षांमध्ये हे स्‍मारक गरजू, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी आश्रयाचे स्‍थान बनले आहे. स्‍मारकात अभ्यास करून अनेक उमेदवार प्रशासकीय पदांवर निवडले गेले आहेत. काही निवृत्तदेखील झाले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

खरंतर क्रांतिकारकांना अपेक्षित भारत घडविण्यासाठी या स्‍मारकात या होतकरू उमेदवारांना आश्रय मिळणे महत्त्वाचे होते. परंतु शासनाच्‍या उदासीन धोरणामुळे येथे नियोजित प्रकल्‍प गेल्‍या चौदा वर्षांनंतरही पूर्ण होऊ शकलेला नाही.

भूमिपूजनानंतर सर्व आलबेल...

राज्‍य शासन व नाशिक महापालिका संयुक्‍त विद्यमाने महापालिकेच्‍या मूलभूत सोयी- सुविधांसाठी शासनाच्‍या विशेष अनुदानाअंतर्गत स्‍मारक प्रांगणात सिटी लायब्ररी बांधकामाचा भूमिपूजन समारंभ २४ ऑगस्‍ट २००९ ला झाला होता. डॉ. शोभा बच्‍छाव यांनी मंजूर केलेल्‍या निधीतून हे काम होणार होते.

तत्‍कालीन माजी मुख्यमंत्री व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांच्‍या हस्‍ते व तत्‍कालीन महापौर विनायक पांडे यांच्‍या अध्यक्षतेखाली भूमिपूजन सोहळा पार पडला खरा, परंतु तेव्‍हापासून पुढे कामाची काहीच प्रगती झाली नाही. सद्यःस्थितीत ही कोनशिला झुडपांच्या विळख्यात अडकलेली आहे.

"हुतात्‍मा स्‍मारकात अभ्यास केलेले अनेक उमेदवार आज प्रशासकीय सेवेतील उच्चपद भूषवीत आहेत. क्रांतिकारकांची माहिती जनसामान्‍यांना पोचविताना येथे गरीब, होतकरू उमेदवारांना आधार मिळावा, असा आमचाही उद्देश आहे. अभ्यासिका उभारणीसाठी शासनाच्‍या स्‍तरावर पाठपुरावा केला जाईल." - विजय राऊत, अध्यक्ष, हुतात्‍मा स्‍मारक समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पनवेल विधानसभा मतमोजणी, प्रशांत ठाकूर आघाडीवर

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

SCROLL FOR NEXT