Kunal Darade Neighbor Manikrao Shinde etc. on the occasion of Bhoomipujan of various development works. esakal
नाशिक

Nashik: येवल्यातील क्रांतीस्तंभाला मिळणार झळाळी! दराडे बंधूच्या पुढाकाराने सुशोभीकरणासह रस्ता कामाला निधी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरणासह क्रांतीस्तंभाला झळाळी मिळणार आहे. आमदार नरेंद्र आणि किशोर दराडे यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने याकामी विशेष निधी मंजूर केला आहे.

या निधीतून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. (Krantistambha in Yevla will get lot of attention Funding for road work including beautification at initiative of Darade brother Nashik)

शहरातील टिळक मैदान येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. याठिकाणी अनेक कार्यक्रम होतात. विविध सण उत्सवांना देखील महाराजांना अभिवादन केले जाते.

त्यामुळे या पुतळ्याच्या वैभवात भर टाकण्यासाठी तसेच महाराणा प्रतापसिंह यांचा देखील पुतळा असून तेथेही सुशोभीकरण करून वैभवात भर टाकणे, आजाद चौकात येथील चळवळीचा इतिहास असलेल्या क्रांतीस्तंभाला देखील सुशोभीकरण व्हावे या उद्देशाने आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार, पालकमंत्री दादा भुसे यांच्या सहकार्याने विकासासाठी भरीव निधी मिळविण्यात आला आहे.

मंजूर करण्यात आलेल्या कोट्यवधी निधीतून शहरातील महापुरुषांचे पुतळे असलेल्या परिसराचे सुशोभीकरण, रस्ता कामे, बजरंग मार्केट परिसराचे नूतनीकरण, काटे मारुती मंदिराचे सुशोभीकरण अशी विविध कामे केली जाणार आहे.

यातील विविध कामांचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, संजय कासार, श्‍यामभाऊ जावळे, शैलेश देसाई, शंकर कालडा, श्रीनिवास सोनी, प्रदीप तक्ते, राजू पारेख, गौरव पटेल, विजय गोसावी, मकरंद तक्ते, योगेश लचके, संजय गायकवाड, योगेश शूल, शैलेश लाड, कल्पेश पटेल, बाळासाहेब कुलकर्णी,

संतोष परदेशी, दिनेश परदेशी, बंटी परदेशी, मंगल परदेशी, धीरज परदेशी, अक्षय राजपूत, निरंजन परदेशी, भूषण शिणकर, अतुल घटे, गौरव कांबळे, तरंग गुजराथी, प्रमोद परदेशी, संजय परदेशी, शालू भागवत, नाना सोनवणे, सुनील पवार, सनी कुमावत, सुनील लोणारी, अनिल पवार, बाबूराव सोनवणे, सचिन वखारे, नीलेश जावळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

"येवला शहर ही जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने येथील नागरिकांचे अनेक मूलभूत प्रश्न रखडलेले होते. त्यामुळे शासन स्तरावर विशेष पाठपुरावा करून आमदार दराडे बंधूंनी शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध केला आहे. शहराच्या इतिहासात प्रथमच नववसाहतीतील अनेक छोटे-मोठे रस्त्यांचे काँक्रिटीकरण आमदार दराडे बंधूंच्या पूर्णत्वास गेले आहे." - कुणाल दराडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT