नाशिक - कृषी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना आता जवळच्या टपाल कार्यालयात पैसे मिळणार आहेत. यासाठी टपाल विभागातर्फे १३ जूनपर्यंत एक विशेष मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती नाशिक विभाग प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी दिली.
केंद्र सरकारने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक टपाल विभागामार्फत सुरू केलेली बँकिंग सेवा आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक लोकाभिमुख आहे. कोरोनाकाळात शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत टपाल विभागाने घरपोच अदा केले. या सेवेच्या माध्यमातून नागरिकांना धन हस्तांतरण (मनी ट्रान्सफर), थेट लाभ हस्तांतरण, देयक भरणा, आरटीजीएस, बँक खाते आधारशी जोडले असेल तर जवळच्या आधार सक्षम पेमेंट सिस्टम सेवेच्या माध्यमातून कोणत्याही बँकेचे पैसे पोस्टमन, डाक सेवक अथवा आपल्या जवळ असलेल्या टपाल कार्यालयातून काढता येणार आहेत.
आता कृषी सन्मान योजनेचे कोणत्याही बँकेचे पैसे पोस्ट ऑफिसमधून लाभार्थ्यांना काढता येणार आहेत. त्यामुळे या सेवाचा लाभ ग्राहकांना घेता यावा, यासाठी जिल्हा टपाल कार्यालयातर्फे ३० मेपासून विशेष मोहीम सुरू झाली आहे. १३ जूनपर्यंत मोहीम राबविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी नाशिक विभागातील सर्व लाभार्थ्यांनी जवळच्या टपाल कार्यालय अथवा आपल्या पोस्टमनशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. अहिरराव यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.