Krishna janmashtami 2023 Esakal
नाशिक

Krishna Janmashtami : गोपालकाला... सामाजिक ऐक्याची मांदियाळी! वारकरी संप्रदायात काल्याच्या कीर्तनाचा उत्सव

सकाळ वृत्तसेवा

Krishna Janmashtami : निज श्रावण कृष्ण अष्टमीला म्हणजेच, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. ७) गोपालकाल्याचा उत्सव हर्षोल्हासात साजरा केला जातो. गोपालकाला उत्सवाला सामाजिक ऐक्याची मांदियाळी असते. वारकरी संप्रदायात काल्याच्या कीर्तनाच्या उत्सवाचे सूत्र आहे. (krishna janmashtami article about gopalkala nashik news)

चला वळूं गाई । बैसों जेऊं एके ठायीं ॥

बहु केली वणवण । पायपिटी जाला सिण ॥

खांदीं भार पोटीं भुक । काय खेळायाचें सुख ॥

तुका म्हणे धांवे । मग अवघें बरवें ॥

अर्थात, गोपाल म्हणाले, ‘‘सवंगड्यांनो चला, आपण इंद्ररूपी गायींना अंतर्मुख करूयात आणि एका ठिकाणी बसून आनंदात जेवू. आतापर्यंत खूप वणवण झाली, पायपीट करून शीण आला आहे. खांद्यावर प्रपंचाचा भार आणि मनात सुखाची भूक असताना संसाराचा खेळ खेळण्यात सुख नाही.’’ संत तुकाराम महाराज म्हणतात, की गड्यांनो, आता जेवणाची घाई करा, त्यात आपले कल्याण आहे.

मुळातच, गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा. काला म्हणजे एकत्र मिसळणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबाचे वा आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी मिसळून तयार झालेला हा एक खाद्यपदार्थ. हा कृष्णास फार प्रिय होता, असे सांगितले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व सर्वजण वाटून खात असत, असा भाव भारतीयांच्या मनात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्रीकृष्ण जयंतीचा प्रसाद गोपालकाला म्हणून संबोधला जातो. कोकणात दहीकाला होतो. भगवान श्रीकृष्ण बालपणी सवंगड्यांसह गोकुळात घरांमध्ये टांगलेल्या शिंक्यातील मडक्यातील दही-लोणी खात असत.

त्याचे प्रतीक म्हणून तरुणाई मनोरे रचून दही-हंडी फोडते. ‘गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाले’ या गीतावर ठेका धरला जातो. मंदिरांमध्ये गोप (गोपाल) वेशात लहानग्यांना नेऊन दही-हंडी फोडण्याचा आनंद घेतला जातो.

काल्याच्या कीर्तनानंतर गोपालकाला केला जातो. त्यामुळे काल्याचे कीर्तन म्हटले जाते. ज्ञानेश्‍वरी, दासबोध पारायण, ग्रंथपठण, कीर्तन महोत्सवात शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. वारकरी वारीची सांगता गोपालकाल्याने करतात.

संत तुकाराम गाथा अभंग

कंठीं धरिला कृष्णमणी । अवघा जनीं प्रकाश ॥१॥

काला वाटूं एकमेकां । वैष्णवा निका संभ्रम ॥ध्रु.॥

वांकुलिया ब्रह्मादिकां । उत्तम लोकां दाखवूं ॥२॥

तुका म्हणे भूमंडळीं । आम्ही बळी वीर गाढे ॥३॥

वारकरी संप्रदायाचे अभ्यासक माधवदास राठी महाराज म्हणाले, की भगवंताचे नामधारण केल्याने आत-बाहेर सगळीकडे प्रकाश आहे. भेद राहिलेला नाही. काला एकमेकांना देत आहोत. वैष्णव संभ्रमरहीत आहोत. मुळातच, भगवंताच्या नामाच्या लाह्या आणि स्निग्धतेचे प्रतीक असलेले दही प्रेममय आहे. म्हणजेच काय, तर जीव-ब्रह्म ऐक्याच्या प्रतीकाचा काला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT