Dignitaries felicitating Kundan Thakur who won the top vocal performance at Shri Baba Harivallabh Sangeet Sammelan. esakal
नाशिक

Nashik News : मालेगावच्या बासरीचा सूर थेट पंजाबात!

योगेश बच्छाव

सोयगाव (जि. नाशिक) : बासरी हे आदिम वाद्य असून, त्यामधून अनेक श्रुतीमनोहर स्वर वाजवता येतात. हे वाद्य दिसायला सोपे वाटले, तरी यावर रागदारी वाजवायला अवघड आहे. हीच किमया साधलीय मालेगावातील महाविद्यालयीन तरुण कुंदन विशाल ठाकूर याने. जालंधर (पंजाब) येथे नुकत्याच झालेल्या श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलनात स्वर वादनाच्या स्पर्धेत कुंदनने बासरी वादन सादर केले. त्यामुळे मालेगावच्या बासरीच्या सूर थेट पंजाबमध्ये ऐकायला मिळाला. (Kundan Thakur from malgegaon pursued hobby of flute while studying in college performed in punjab nashik news)

स्पर्धेत एकूण २७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. त्यात कुंदन ठाकूर बासरी वादनात अव्वल ठरला. त्याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ही मालेगावकारांसाठी अभिमानाची बाब आहे. कुटुंबात आजोबांना संगीताची आवड होती; पण संगीत क्षेत्रात तसं घरातलं कोणीच नव्हतं.

आपल्या नातवाला गाणे ऐकणं, वाद्य हाताळणं आवडतं हे आजोबांनी ओळखल्यामुळे त्यांनी कुंदनला तिसरीत असताना कॅसियोचा (पियानो) क्लास प्रशांत बच्छाव यांच्याकडे लावून दिला. पुढे सुजित पाटील यांनी त्याची हार्मोनियमची तालीम घेतली. घरी जास्तीचा सराव व्हावा म्हणून आजोबांनी हार्मोनियम घेऊन दिली. अभ्यासासोबत कुंदन आता छंद म्हणून हार्मोनियमचा सराव करू लागला. स्वरांचा सराव, आजोबांची शिकवण त्यास कामी आली.

पुढे सहावीला असताना एका मैफिलीत क्लासमध्ये स्पीकरवर ‘सजन दारी उभा’ हे गाणं त्याने ऐकले. त्यात वाजवलेली बासरी त्याला खूप आवडली. आपणही बासरी वाजवायला शिकायचे हे त्याने ठरवले. हाच त्याच्या आयुष्यातील बासरी वादन क्षेत्रातील टर्निंग पॉईंट ठरला. आजोबांची बासरीविषयीची वही व ते वाजवत असलेली बासरी त्याला मिळाली.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

त्यावर त्याने शिकायला सुरवात केली. पुढे त्याने विजय भालेराव या गुरूंकडून शिक्षण घेतले. बासरी वादनाच्या प्रवासात त्याला मित्र राहुल शर्माचं मार्गदर्शन लाभलं. भाऊ चैतन्य याने सातत्याने सराव, अभ्यास करून घेतला आणि अजूनही घेतोय. अनेक कार्यक्रमात सहभागी होत छाप सोडणारा कुंदन आपल्या यशात आई- वडील, कुटुंब आणि गुरूजनांचे मार्गदर्शन असल्याचे सांगतो. त्याचा हा छंदवेडा प्रवास प्रेरणादायी आहे.

"संगीत ही एक साधना आहे. तिला समजून घ्या. तिला मनापासून आत्मसात करायचं असेल, तर जास्तीत जास्त वेळ द्या, प्रेम द्या. छंद पूर्ण करताना अभ्यासालाही मी योग्य न्याय दिलाय. दहावीत ९३ टक्के तर, बारावी विज्ञान शाखेत ७७ टक्के मार्क मिळाले. सध्या मी मसगा महाविद्यालयात एफ. वाय. बी. एस्सी करतोय." -कुंदन ठाकूर, बासरी वादक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT