Nashik News : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील करंजाड, गुगुळवाड, भीमखेत, वाघंबा, मानूर, केळझर, तताणी या भागातून पावसाळ्यातील रानभाजी म्हणून परिचित असलेले कर्टुले बाजारात दाखल झाले आहेत. ग्राहक खरेदीला पसंती देत आहेत.
भाजी कारल्यासारखी कडू असली तरी शरीरास पोषक मानली जाते. कोणत्याही प्रकारचे औषध फवारणी नसलेली ही रानभाजी साधारणत ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरमध्ये ग्राहकांना उपलब्ध होते. (Kurtule in western belt of Baglan entered market Consumer preference for healthy wild vegetables Nashik News)
उत्तम पोषण व औषधीमूल्य असलेल्या रानभाजीला मोठी मागणी असते. कर्टुलेचे वर्षायू वेल जंगलामध्ये झुडपांवर वाढतात. या वेलींना जमिनीत कंद असतात. कंद बहुवर्षायू असून, ते औषधात वापरतात.
कर्टुलीच्या भाजीमुळे अनेक आजारांना दूर ठेवता येते. त्यामुळे या भाजीला शक्तिली भाजी म्हटले जाते. ही भाजी २०० रुपये प्रतिकिलोने मिळते. कर्टुल्याची भाजी रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. कर्टुल्याच्या रसाचा आहारात समावेश केला तरी रक्तदाब नियंत्रणात राहतो.
कर्करोगापासून संरक्षण
कर्टुल्यात ल्युटीन आढळते. त्यामुळे हृदयाच्या समस्यांसह कर्करोगही टाळता येतो. हा व्हिटॅमिन सीचा चांगला स्त्रोत आहे.
जो शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो. भाजीत व्हिटॅमिन, मिनरल, फायबरसारखे अनेक आवश्यक पोषकत्त्व असतात. कर्टुल्यामध्ये जीवनसत्त्व ‘अ’ मोठ्या प्रमाणात असते. जे डोळ्यांसाठी फायदेशीर असते.
"आमच्या भागात जंगलसंपत्ती असल्याने या भाज्या उपलब्ध होतात. दिवसभर जंगलात फिरून पाच ते सात किलो कर्टुले मिळतात. शहरात भरपूर मागणी आहे. जाईच्या मोहरबरोबरच ही भाजीही मिळते." - धवळू सूर्यवंशी, गोळवाड, ता. बागलाण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.