lack of entertainment facilities in Nashik citizen go to travel to other cities nashik news  
नाशिक

Nashik Diwali Vacation: दूरदृष्टीअभावी सुट्यांमध्ये नाशिककरांची तारांबळ; मनोरंजनासाठी अन्य शहरांकडे जाण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: रस्ते, पाणी, आरोग्य व शिक्षण याप्रमाणेच मनोरंजनाची सोय उपलब्ध करून देणे, ही देखील महापालिकेची जबाबदारी असताना महापालिकेसह स्मार्टसिटी कंपनीकडे दूरदृष्टीच्या अभावामुळे मनोरंजनाची साधने न झाल्याने दिवाळीच्या सुट्यांमध्ये नाशिककरांना अन्य शहरांकडे जाण्याची वेळ आणली गेली. शहरात तीन, चार तास मनोरंजन होऊ शकेल, अशी जागा निर्माण करण्यात महापालिका व स्मार्टसिटी कंपनीला अपयश आले आहे.

जवळपास २२ लाख लोकसंख्येच्या शहरात मनोरंजनाचे एकही स्थान नाही. दादासाहेब फाळके स्मारकाची ठेकेदारी पद्धतीमुळे वाताहात झाली आहे. (lack of entertainment facilities in Nashik citizen go to travel to other cities nashik news)

बॉटनिकल गार्डनमध्ये मनसेच्या सत्ताकाळात बोलकी झाडे लावली. उद्‍घाटनापुरतेच झाडे बोलली. त्यानंतर प्रकल्पाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. तारांगण प्रकल्प चालविताना वर्षानुवर्षांपासून एकच शो दाखविला जात असल्याने विद्यार्थी कंटाळले.

शहरात साडेपाचशेहून अधिक उद्याने असल्याची पाठ थोपटून घेतली जाते; परंतु ती उद्याने नावालाच आहे. जवळपास सर्वच उद्यानांची वाताहात झाली असून, देखभाल दुरुस्तीच्या नावे ठेकेदार पोसण्यासाठीच उद्याने निर्माण झाली आहेत. सुट्यांमध्ये मुले, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा होईल, असे एकही स्थान नाही.

नाशिक धार्मिक शहर असल्याने येथे परराज्यातील भाविक येतात. दर्शन झाल्यानंतर शेगावच्या धर्तीवर मनोरंजन पार्क असणे आवशक्य असताना ते होत नाही. सोमेश्वर येथे बोटिंगची व्यवस्था आहे; परंतु जवळपास गोदावरीचा १९ किलोमीटरचा प्रवाह असताना शंभर मीटर परिसर वगळता बोटिंगसाठी स्थळ नाही.

बोटिंग ‘जेटी’ बंद

अहिल्यादेवी होळकर पूल त रामवाडी व पुढे आनंदवलीपर्यंत स्मार्टसिटी कंपनीच्या वतीने बोटिंगचा निर्णय घेण्यात आला. बोटीच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करण्याबरोबरच मनोरंजनासाठी देखील साधन निर्माण होण्याच्या दृष्टीने सोय होती. परंतु स्मार्टसिटी कंपनीच्या वतीने सुरवातीला जे.टी. तयार करण्यात आली.

आता तर जे.टी. साठी आणलेले साहित्य देखील बाजूला काढून ठेवण्यात आले आहे. रामतीर्थावरील महात्मा गांधी तलावातील बोटिंग देखील बंद आहे. मोठे शहर असूनही अॅम्युझमेंट पार्क नाही. परिणामी, मनोरंजनासाठी नाशिककरांना ठाणे, पुणे, दमण, सापुतारा गाठावे लागत आहे.

"नाशिकमध्ये मनोरंजन करण्यासाठी हक्काची जागा नाही. महापालिका किंवा स्मार्टसिटी कंपनीने फाळके स्मारकाचे स्वरूप बदलावे. अॅम्युझमेंट पार्कसाठी प्रयत्न करावे." - कृणाल पाटील, अध्यक्ष, क्रेडाई मेट्रो

"बावीस लाख लोकसंख्येच्या नाशिकमध्ये शेगावच्या धर्तीवर मोठे मनोरंजन पार्कची आवश्यता आहे." - सुनील गवादे, सदस्य, नरेडको

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT