Work on water bodies under Jaljeevan Mission esakal
नाशिक

Nashik News : जलजीवनच्या कामात ‘जल’चाच अभाव! गोंदेगावात जलकुंभाच्या कामावर पाणी मारण्याकेड दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरासमोर नळजोडणीचा उद्देश असलेल्या जलजीवन योजनेची कामे निफाड तालुक्यात धडाक्यात सुरू आहेत. बहुतेक कामे सुरू झाली असली तरी कामावर पुरेसे पाणी मारले जात नसल्याने ही कामे कमकुवत राहण्याची शक्यता आहे.

या कामांच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्यासाठी जिल्हा परिषदेचे संबंधित कनिष्ठ अभियंता चक्कर मारतील का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. (Lack of water in Jaljeevans work Gondegaon neglecting water supply on water tank works Nashik News)

गोंदेगावचा देखील या योजनेत समावेश असून नवीन जलकुंभाचे काम प्रगतीपथावर आहे. जलकुंभाचा पाया व कुंभाचा सांगाडा उभारला गेला असून साठवण कुंभाचे काम बाकी आहे. परंतु, सध्या सुरू असलेल्या बांधकामावर पाणीच मारले जात नसल्याने ठेकेदाराने 'पाणी वाचवा' धोरण अवलंबिले आहे का असे उपरोधिकपणे म्हटले जात आहे.

परिणामी, बांधकाम धोक्यात येण्याची शक्यता आहे. अंदाजपत्रकात मंजूर असलेले बांधकाम कसेबसे पूर्ण करण्यावर ठेकेदाराचा भर असेल तर इतका मोठा निधी मिळून देखील योजनेचा उद्देश सफल होणार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

गोंदेगावसाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत एक कोटी पासष्ट लाखांचा निधी मंजूर आहे. यात नवीन जलकुंभ, विहीर, पंपघर, पंपिंग मशिनरी, मुख्य पाईपलाईन, वितरण व्यवस्था आदी कामांचा समावेश आहे. यापैकी एक लाख साठ हजार लिटर क्षमता असलेल्या जलकुंभाचे बांधकाम सुरू आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

भर उन्हाळ्यात सुरू असलेल्या या बांधकामावर सातत्याने पाण्याचा फवारा मारणे आवश्यक आहे. त्यामुळे बांधकामात भक्कमपणा निर्माण होऊन त्याचे आयुर्मान वाढेल. अन्यथा, पाणी कमी पडल्यास तडे जाण्याचा संभव आहे.

त्यामुळे उन्हाची तीव्रता बघता जलकुंभाच्या बांधकामावर पाणी मारणे आवश्यक आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही. बांधकाम सुरू असतांनाच ठेकेदार दुर्लक्ष का करतोय असा प्रश्‍न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे निफाड गटविकास अधिकाऱ्यांनी इतर अधिकाऱ्यांसह नुकतीच बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या नजरेत कोरडे बांधकाम सुटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT