Villagers along with Sarpanch, Sub-Sarpanch and members during the strike of Auston Paper Mill Company by Gram Panchayat. esakal
नाशिक

Nashik News : लखमापूर ग्राम पंचायतीकडून ऑस्टन पेपर मिलला टाळे! उग्र वास, धुरामुळे आरोग्य धोक्यात

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लखमापूर (ता. दिंडोरी) औद्योगिक वसाहतीतील ऑस्टन पेपर मिल प्रा. ली. या कंपनीच्या बॉयलरमधून निघणारा काळा धूर, काजळी आणि अती उग्र वासामुळे उद्‌भवणाऱ्या समस्यांनी त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने बुधवारी (ता. १२) कंपनीला टाळे ठोकले. त्यामुळे येथील उत्पादन तूर्तास बंद करण्यात आले आहे. (Lakhmapur Gram Panchayat Bans Auston Paper Mill Nashik News)

याबाबत ग्रामपंचायततर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या २५ ऑगस्ट २०२२ ला झालेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी या त्रासाबद्दल चर्चा केली होती. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाने ७ सप्टेंबर २०२२ला कंपनीला नोटीस देऊन कळविले होते.

दुसऱ्या दिवशी ८ सप्टेंबरला ग्राम पंचायत व ग्रामस्थांच्या समक्ष पंचनामाही करण्यात आला. त्यानंतरही कंपनीकडून काहीही उपाययोजना केल्या जात नसल्याचे लक्षात आल्याने सततच्या तक्रारींची दखल घेत मंगळवारी (ता. ११) सर्वांनी प्रत्यक्ष पेपर मिलमध्ये जाऊन परिस्थितीत सुधारणा करण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयामार्फत नोटीस देण्यात आली.

तसेच, सरपंच संगीता देशमुख, उपसरपंच किशोर सोनवणे, ग्रामविकास अधिकारी संजय पाटील आणि सदस्य व ग्रामस्थांनी बुधवारी कंपनीला टाळे ठोकले. कंपनीला देण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, कंपनीत बॉयलर पेटविण्यासाठी प्लास्टिकचा वापर होतो.

ही बाब अत्यंत गंभीर असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत आहे. कंपनीतून निघणाऱ्या धुरामुळे दुर्गंधी व प्रदूषण बंद करावे, इतरत्र पसरणारे काजळीचे प्रदूषणही त्वरित बंद करावे, बॉयलर पेटविण्यासाठी प्लास्टिकचा वापर पूर्णतः थांबवावा.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

त्यामुळे कंपनीलगत शेती असलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कंपनीने स्वतः आपल्या स्तरावरून प्रयत्न करावेत. तसेच, या सर्व बाबींची दक्षता घेईपर्यंत कंपनीने तूर्तास उत्पादन बंद ठेवावे, असेही नोटीशीत म्हटले आहे.

विशेष म्हणजे ही कंपनी गावाच्या पश्‍चिम दिशेला असल्याने बॉयलरमधून निघणारे काळे गडद धुराचे लोट गावात पसरतात. त्यामुळे आसपासच्या आणि दूरवर असलेल्या शेती पिकांनाही याचा खूपच त्रास होतो. याविषयी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार करून याविषयी काही तरी मार्ग काढावा असे सुचविले आहे.

अती उग्र वासाने नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. त्यामुळे ग्रामपंचायततर्फे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्या सहिनिशी कंपनीला नोटीस देत, उत्पादन तूर्तास बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

त्यानुसार कंपनीने उत्पादन बंद केले आहे. दरम्यान, या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, दिंडोरीचे गट विकास अधिकारी, तहसीलदार, वणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनाही या नोटीशीच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT