Nashik News: महापालिकेकडून एकीकडे कर्जाची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे मनपा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गोदाघाटावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेता रोज हजारो रुपयांची वसुली अपेक्षित असताना केवळ काही हजार रुपयांची वसुली सुरू आहे.
त्यामुळे महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, ही वसुली करण्याची भिस्तही एकाच कर्मचाऱ्यावर आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर तब्बल दहा वर्षे प्रशासकीय राजवट होती. त्यानंतर प्रथमच गत दोन वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. (Lakhs of revenue is lost due to lack of parking fee at goda ghat nashik news)
गोदाघाटावरील गौरी व म्हसोबा पटांगणावर पार्किंगसाठी थांबलेल्या वाहनांकडून पार्किंग फी वसूल केली जाते. यात जीप, कार अशा छोट्या वाहनधारकांकडून चाळीस रुपये, तर बससाठी शंभर रुपयांची आकारणी केली जाते.
मात्र रामतीर्थाच्या वरील बाजूस, तसेच जुन्या भाजी बाजाराच्या जागेवरील पार्क केलेल्या वाहनांकडून कोणतीही वसुली होत नाही. खरेतर जेवढी वाहने गौरी व म्हसोबा पटांगणावर उभी राहतात, त्यापेक्षा अधिक वाहने रामतीर्थाच्या वरील बाजूस व जुन्या भाजी पटांगणावर उभी राहतात. मात्र या ठिकाणी वसुलीच होत नसल्याने महापालिकेला रोज हजारो रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे.
आयुक्तांकडूनच स्थगिती
दोन वर्षांपूर्वी रामतीर्थाच्या वरील बाजूस व चतुःसंप्रदाय आखाड्याच्या खालील बाजूस मोठ्या प्रमाणावर चारचाकी वाहने उभी केली जात होती. याठिकाणी स्मार्टसिटी अंतर्गत भुयारी गटारीचे काम बरेच दिवस सुरू असल्याने येथील पार्किंग शुल्काच्या वसुलीस तत्कालीन महापालिका आयुक्तांनी स्थगिती दिली.
आता याठिकाणी चांगला रस्ता तयार झाला असून, वाहनेही मोठ्या प्रमाणावर पार्क केली जातात. परंतु त्यांच्याकडून कोणतीही वसुली होत नसल्याची माहिती मनपा कर्मचाऱ्यानेच दिली. जुन्या भाजी बाजाराच्या जागेच्या मालकीवरून वाद असल्याने याठिकाणचीही वसुली होत नाही, मात्र जागा वादग्रस्त असूनही याठिकाणी लाखो रुपये खर्च करून फरशा बसविण्यात आल्या आहेत, हे महत्त्वाचे.
बोगस पावत्यांची चर्चा
नाशिक महापालिका गोदाघाटावरील वाहनांच्या पार्किंगचे शुल्क स्वतः वसूल करते. त्यासाठी कोणत्याही ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आलेली नाही. मात्र तरीही गोदाघाटावरील ज्याठिकाणी मनपाकडून वसुली होत नाही अशा ठिकाणी काही जणांकडून बोगस पावत्यांद्वारे वसुली सुरू असल्याची चर्चा आहे.
याला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी काही रिक्षाचालकांनी अशी बोगस वसुली होत असल्याची पक्की खात्री दिली. याबाबत मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, शनिवार, रविवारसह दिवाळीच्या सुट्यांमुळे अनेकजण सुटीवर असल्याचे त्यांनी सांगितले.
वसुलीची धांदल
गोदाघाटावरील ज्याठिकाणी महापालिकेकडून पार्किंगची वसुली केली जाते त्याठिकाणी महापालिकेने केवळ एकच कर्मचारी नियुक्त केला आहे. गोदाघाटावर सकाळच्या सुमारास गौरी व म्हसोबा पटांगणावर एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर वाहने आल्यास संबंधित कर्मचाऱ्याची वसुलीसाठी मोठी धांदल उडते.
येथे होतेय अनधिकृत पार्किंग
गाडगे महाराज पूल, जुना भाजी बाजार, चतुःसंप्रदाय मंदिराशेजारील भूखंड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.