Rajendra Borgude, Yogesh Borgude, Dattu Bhawar, Devidas Borgude etc. while welcoming food sacrifice on Sunday.  esakal
नाशिक

Nashik News: चुकीच्या राजकीय धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी : बहाळे

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्रातील शेतकरी स्वाभिमानी व कष्टाळू आहे. अनेक संकटांशी सामना करून माझा शेतकरी एका दाण्याचे हजारो दाणे करून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो.

परंतु, शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरीच बेरोजगार व थकबाकीदार झाला आहे. असे मत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित पाटील बहाळे यांनी येथे व्यक्त केले आहे. (lalit bahale statement Due to wrong political policy farmers are in debt market Nashik News)

अन्न त्याग पायी दिंडीदरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा बँकेसह केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात शेतकरी संघटनेतर्फे खेडले झुंगे येथून अन्नत्याग पायी दिंडी काढण्यात आली आहे.

या दिंडीचे रविवारी (ता. २५) नैताळे रामपूर ग्रुप ग्राम पंचायतीत स्वागत करण्यात आले. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना श्री. बहाळे म्हणाले, की आपल्या घरादाराचा, मालमत्तेचा लिलाव व्हावा, असे कोणत्याही शेतकऱ्याला वाटत नाही.

परंतु सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे त्यांना वेळेत कर्जफेड करता येत नाही. त्या कर्जावर बँक चक्रवाढ पद्धतीने व्याजदर लावून वसूल करीत आहे. या धोरणाच्या विरोधात आम्ही अन्नत्याग पदयात्रा काढली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या यात्रेत सहभागी होऊन १ जुलैला नाशिक येथे करण्यात येणाऱ्या उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरगुडे, सोसायटीचे संचालक देविदास बोरगुडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तू भवर, योगेश बोरगुडे यांनी श्री. बहाळे यांना ग्लासभर पाणी पाजून यात्रेचे स्वागत केले.

जिल्हाध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे, मोतीराम पानगव्हाणे, खेमराज कोर, रमेश पवार, सुभाष गवळी, शिवाजी रसाळ, मुरलीधर सोनवणे, रामकृष्ण बोंबले, मारुती मोरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा निर्मला जगताप, श्री. संधान आदी या यात्रेत सहभागी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT