Former director of 'Namco' Lalit Modi, Vasant Gite, Sohanlal Bhandari, Ajay Brahmecha, Vijay Sane, Hemant Dhatrak, Prashant Dive, Ranjan Thackeray and other members present while filing application form for Nashik Merchant Bank election. esakal
नाशिक

NAMCO Election: नामको निवडणुकीत उतरणार ललित मोदी; इंडिया आघाडीने एकमेकांविरोधात थोपटले दंड

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी निवडणुकांसाठी देशपातळीवर आघाड्यांचे राजकारण सुरू झाले असताना नाशिकमध्ये मात्र नामको बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी व विरोधकांची नवी आघाडी उदयाला येणार असल्याचे दिसून येत आहे.

मात्र दुसरीकडे इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांसमोर दंड थोपटण्याची देखील तयारी केली आहे. शिवसेना (उबाठा), भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेत एकाच पॅनलच्या माध्यमातून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

तर दुसरीकडे नामकोचे माजी संचालक आणि कायम सत्ताधारी विरोधात असलेले ललित मोदी, अजय ब्रह्मेचा यांनी सत्ताधाऱ्यांसमवेत अर्ज दाखल केल्याने निवडणुकीचे समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Lalit Modi to contest NAMCO election India Aghadi slapped penalties against each other nashik)

नाशिक मर्चंट बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता. २९) ११३ अर्जांची विक्री झाली. आज दिवसभरात २१ जागांसाठी १०६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

विशेषतः सत्ताधारी पॅनलकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात प्रामुख्याने विद्यमान अध्यक्ष वसंत गिते, विजय साने, हेमंत धात्रक, सोहनलाल भंडारी, रंजन ठाकरे, प्रफुल्ल संचेती, शोभा छाजेड, रजनी जातेगावकर, प्रशांत दिवे, शिवदास डागा, सुभाष नहार, नरेंद्र पवार यांसह अजित बागमार, ललित मोदी, अजय ब्रह्मेचा, हरिश लोढा, अविनाश गोठी, कांतिलाल जैन, प्रकाश दायमा, दीपाली गिते, उल्हास सातभाई, अरुणकुमार मुनोत आदींचा समावेश आहे.

सत्ताधारी पॅनलकडून अर्ज दाखल झाले असताना उमेदवारांची नावे अंतिम करण्याचे काम नेतृत्वाकडून सुरू झाले आहे. अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची भूमिका सत्ताधारी पॅनलकडून घेण्यात आली आहे.

त्यामुळे सत्ताधारी पॅनलकडून कोणाला वगळले जाणार, याकडे लक्ष लागले आहे. दुसऱ्या बाजूला विरोधी पॅनलकडून उमेदवार चाचपणीसाठी बैठकांचे सत्र सुरू होते.

प्रामुख्याने तगडे उमेदवार देण्याची रणनीती आखली जात असून, गुरुवारी (ता. ३०) त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोदी, ब्रह्मेचा सत्ताधारी गटात

सत्ताधारी पॅनलविरोधात कायम लढा देणारे गत निवडणुकीत विरोधी पॅनलचे नेतृत्व करत असलेले ललित मोदी, अजय ब्रह्मेचा हे सत्ताधारी गटात सामील झाल्याचे सांगितले जात असून, त्यांनी बुधवारी एकत्र अर्ज दाखल केला.

या बदलत्या समीकरणामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच गत निवडणुकीत स्व. बागमार कुटुंबीयांतील सदस्यही विरोधात होते. परंतु यंदा कुटुंबातील सदस्यांना सोबत घेण्याची भूमिका सत्ताधारी पॅनलने घेतल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: एकनाथ शिंदेंनी शब्द खरा करून दाखवला, विधानसभेतील 'ते' भाषण व्हायरल

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

Maharashtra Assembly Election Results: महायुती २०० पार, तर मविआची अनेक जागांवर हार, जाणून घ्या सर्व पक्षांच्या 'स्ट्राइक रेट'चा अहवाल

SCROLL FOR NEXT