Lalit Patil Drug Case esakal
नाशिक

Lalit Patil MD Drug Case: ड्रग्जमधून कमावलेला काळा पैसा गेला कुठे? नोंदणी महानिरीक्षकांकडील तपशिलाची प्रतिक्षा

सकाळ वृत्तसेवा

Lalit Patil MD Drug Case : एमडी ड्रग्जमाफिया ललित व भूषण पाटील बंधूंसह अरविंद लोहारे यांच्याकडील मालमत्तेबाबत राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.

त्यांच्याकडील अहवाल अद्याप प्राप्त नसल्याने त्यांच्या कोणत्याही मालमत्तेची माहिती मिळू शकलेली नाही. ललित पाटीलकडील दोन चारचाकी वाहने पुणे पोलिसांनी दोन आठवड्यांपूर्वीच जप्त केल्या आहेत.

फॉर्च्युनर वाहन भूषण वापरत होता, तर पोलो वाहन हे भूषण याने ललितच्या सांगण्यावरून त्यांची मैत्रिण ॲड. प्रज्ञा कांबळे हिला वापरण्यास दिले होते, असेही चौकशीतून समोर आल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले. (Lalit Patil MD Drug Case Where did black money earned from drugs go Awaiting details from Inspector General of Registration nashik crime)

पुणे, मुंबई आणि नाशिक पोलीस ललित पाटीलसह मुख्य संशयितांच्या मालमत्तेचा शोध घेत आहेत. त्यासाठी पुणे पोलिसांनी राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्याकडे या प्रकरणातील मुख्य संशयित पाटील बंधू व आणखी काही संशयितांच्या आर्थिक व्यवहारांसह मालमत्तेची माहितीसाठी पत्रव्यवहार केला आहे.

या माहितीतून संशयितांनी ड्रग्जच्या काळाबाजारातून मिळालेल्या आर्थिक व्यवहाराची व मालमत्तेची माहिती मिळू शकणार आहे. त्यामुळे त्या तपशिलाच्या प्रतिक्षेत पोलिस आहेत.

ड्रग्जमाफिया ललित पाटील गेल्या महिन्यात पुण्याच्या ससून रुग्णालयातून पळाला होता. त्यास मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली होती. याप्रकरणी ललित पाटील, भूषण पाटील, अरविंदकुमार लोहारे या प्रमुख संशयितांसह १४ जणांना अटक करण्यात आलेली आहे.

या संशयितांविरोधात संघटित गुन्हेगारी अंतर्गत मोक्काअन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप संशयितांकडून ठोस व पुरेशी माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

त्यामुळे पुणे पोलिसांनी मोक्काअन्वये १४ संशयितांच्या एकत्रित चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली आहे.

ललित पाटील सध्या पुणे पोलीसांकडे येत्या १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत आहे. कोठडीची मुदत संपल्यानंतर होणार्या सुनावणीवेळी मोक्कातील संशयितांच्या कोठडीवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

"ललित पाटील याची वाहने दोन आठवड्यांपूर्वीच जप्त केली आहेत. मालमत्तेबाबत पत्रव्यवहार केला आहे परंतु अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. संशयितांची मोक्काअंतर्गत प्रोडक्शन रिमांड घेऊन चौकशी करावयाची आहे. त्यातून ठोस माहिती मिळू शकेल."

- सुनील तांबे, सहायक पोलीस आयुक्त तथा तपास अधिकारी, शहर गुन्हेशाखा, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT