नाशिक : भारतमाला प्रकल्पांतर्गत ‘ग्रीन फिल्ड महामार्ग’ संकल्पनेनुसार चेन्नई-सुरत ग्रीन फिल्ड महामार्गासाठी जिल्ह्यातील चार तालुक्यांत साधारण मार्चअखेर भूसंपादनाचे शासनाचे नियोजन आहे.
जिल्ह्यात सहा तालुक्यांतून जाणाऱ्या या मार्गासाठी चार तालुक्यांत भूसंपादनाला प्राधान्य दिले जाणार आहे. (Land acquisition for Chennai Surat by end of March Priority acquisition in 4 out of 6 talukas in district Nashik News)
राज्यात नाशिक, नगर, सोलापूर, हैदराबाद, चैन्नई ही औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील ६०९ गावांमधून जाणाऱ्या या महामार्गासाठी ९९६ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे.
नाशिक-सुरत अवघे १७६ किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे नाशिककरांना अवघ्या दोन तासांत सुरत शहर गाठता येईल. हैदराबाद येथील आर्वी असोसिएटस आर्किटेक्चर डिझायनर कन्सल्टंट प्रा. लि. या कंपनीला रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यात १२२ किलोमीटर अंतर असून, त्यासाठी ९९७ हेक्टर जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे. सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड व सिन्नर अशा सहा तालुक्यांतील ६९ गावांचा समावेश आहे. त्यापैकी एकट्या दिंडोरीतील सर्वाधिक २३ गावांचा समावेश आहे.
चार तालुक्यांना प्राधान्य
यंदाच्या आर्थिक वर्षात मार्चअखेर सिन्नर, दिंडोरी, नाशिक आणि निफाड या चार तालुक्यांतील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. केंद्राच्या या रस्त्यासाठी समृद्धी महामार्गाप्रमाणे वाटाघाटीने भूसंपादन होणार असून, सक्तीची भूसंपादन प्रक्रिया आहे.
त्याविषयी हरकती असल्यास शेतकऱ्यांना न्यायालयात दाद मागावी लागणार आहे. असे असले, तरी जिल्हा प्रशासनाचा मात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी मूलभूत किंमत वाढवून देण्याचा प्रयत्न आहे.
इतर प्रकल्पाप्रमाणे चार किंवा पाचपट भाव वाढवून देण्याऐवजी मूलभूत (बेसिक) किंमत वाढवून त्यात एकसूत्रीपणा आणण्याचे नियोजन आहे.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
भूसंपादक होणारी गावे
दिंडोरी : तेटमाळा, रडतोंडी, कवडासर, चिल्हारपाडा, महाजे, चाचडगाव, उमराळे बुद्रुक, जांबुटके,
नाळेगाव, इंदोरे, राशेगाव, ननाशी, पिंपळनेर, रामशेज, आंबेदिंडोरी, ढकांबे,
शिवनाई, वरवंडी, गांडोळे, गोळशी, जर्लीपाडा, आंबेगाव, बहुर, पेठ ः
पाहुचीबारी, विर्मळ, कळंबरी, वडबारी, हरणगाव
नाशिक ः आडगाव, ओढा, विंचुरगवळी, लाखलगाव.
निफाड ः चेहडी खुर्द, चाटोरी, वरहे, लालपाडी, रामनगर, दारणासांगवी, सावळी, तळवाडे, पिंपळगाव निपाणी
सिन्नर ः देशवंडी, पाटपिंप्री, निमगाव देवपूर, बारागावपिंप्री, गुळवंच, देवपूर, खोपडी बुद्रुक, धारणगाव, फर्दापूर, पांगरी बुद्रुक, भोकणी, पांगरी खुर्द,
फुलेगनर, कहांडळवाडी, घोटेवाडी, वावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.