When washing clothes in a sink. esakal
नाशिक

Nashik News : गोदापात्रात बंदी झुगारून कपड्यांची धुलाई; प्रशासनाला कारवाईचा विसर

गोदापात्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण केले जात असल्याचा प्रकार कपड्यांच्या होणाऱ्या धुलाईने होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गोदापात्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण केले जात असल्याचा प्रकार कपड्यांच्या होणाऱ्या धुलाईने होत आहे. कपडे धुण्यास मनाई असतानाही ती झुगारून सर्रास कपडे धुण्यात येत असल्याने गोदाकाठ हा जणू काही धोबीघाट झाला असल्याचे दिसत आहे.

गोदापात्रात प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला बजावले असतानाही गोदापात्रात सर्रास कपडे धुतले जात असताना कपडे धुणाऱ्यांना विरोध होत नाही. त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही.(large amount of pollution in Godapatra is caused by washing of clothes nashik news)

सकाळपासून सायंकाळपर्यंत कपडे धुण्यासाठी गोदाघाटावर गर्दी झालेली दिसते. वाहत्या पाण्यात केवळ अंगावरचेच नाही तर घरातील वापरातील सर्वच कपडे धुण्यासाठी गोदापात्रात आणली जात आहेत. धुतलेले कपडे गोदाघाटावर वाळत टाकले जात असल्यामुळे हा गोदाघाट जणू काही धोबीघाट बनला आहे असे चित्र दिसत आहे.

पाणी वाहते आहे. त्यामुळे त्यात काय काही समाविष्ट होऊ जाईल असाच दृष्टिकोन ठेवला जात असले तरी प्रदूषण थांबणारच नाही. गोदापात्रातील पाणी प्रदूषित होऊ नये, यासाठी गोदा संवर्धन कक्षाची स्थापना करण्यात आलेली होती. या कक्षाच्या सुरवातीच्या काळातील कामकाज चांगल्या प्रकारे झाल्यामुळे गोदापात्र खुलून दिसत होते.

कालांतराने हा कक्ष बंद पडला. आता वाहत्या पाण्यात सुरक्षारक्षकांच्या समोर कपडे धुण्यात येत असताना त्यांना रोखण्यात या कर्मचाऱ्यांना अपयश येत असल्यामुळे गोदावरीचे प्रदूषण थांबलेले नाही. भाविक आणि पर्यटकांची गोदाकाठावर गर्दी वाढली आहे. त्यांना गोदाकाठावर अशा प्रकारे कपडे धुणाऱ्यांचीच गर्दी आणि त्यांनी धुवून वाळत घातलेले कपडे बघण्याची वेळ येत आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोदावरी नदीपात्र प्रदूषित करणे, धुणेभांडे करणे , निर्माल्य व केरकचरा टाकणे प्लॅस्टिक टाकल्यास फौजदारी गुन्हा दाखल करावा असे निर्देशित करण्यात आले असतानादेखील असे प्रकार सर्रास सुरू आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

''गोदावरी नदीत प्रदूषण करणारे दोन घटक आहे मानवी प्रदूषण व प्रशासकीय प्रदूषण. उच्च न्यायालयाने कारवाई करण्यासाठी संबंधित यंत्रणा नियुक्त केल्या आहेत. नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.''- निशिकांत पगारे, याचिकाकर्ते, गोदावरी नदी प्रदूषण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT