Dilip Khaire, Jaydutt Holkar, Balasaheb Lokhande, Harishchandra Bhawar, Vilas Gore etc. during the trial of 16 village water supply scheme. esakal
नाशिक

Nashik Water Crisis: लासलगावकर 45 दिवसांपासून पाणीविना; नवीन जलवाहिनीची चाचणी, तरीही महिलांची भटकंती

सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Crisis : लासलगावसह १६ गाव पाणीयोजनेच्या नवीन जलवाहिनीची यशस्वी चाचणी होऊनही लासलगावकरांना दीड महिन्यापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. (Lasalgaon people without water for 45 days Testing new aqueduct women still wander nashik)

दिलीप खैरे, सरपंच जयदत्त होळकर, विलास गोरे, सचिन दरेकर, बाळासाहेब लोखंडे आदींनी १० ऑगस्टला जलवाहिनीची चाचणी घेऊन गाजावाजा करून उद्‌घाटन केले. मात्र, सात दिवस उलटूनही पाणी लासलगावपर्यंत पोहोचले नाही.

त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे दावे फोल ठरले आहेत. पाणीप्रश्न सुटेल, या आशेवर असलेल्या भाबड्या लासलगावकरांचा हिरमोड झाला आहे. यशस्वी चाचणी झाल्यानंतरही दोन वेळेला नवीन जलवाहिनीला गळती लागल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. त्यात १६ गाव पाणीपुरवठा योजनेचा भरोसा नागरिकांना राहिलेला नाही. त्यामुळे पाणी नक्की मिळेल का, हा यक्ष प्रश्न लासलगावकरांना भेडसावत आहे.

"स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाली, पण लासलगावकरांना पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. यासारखे दुर्दैव नाही. लासलगावकरांचा पाणीप्रश्न ऐरणीवर आहे. फक्त काम पूर्ण झाल्यासंदर्भात पेप बाजी करून जनतेच्या तोंडाला पाणी पुसली आहे. ४५ दिवसांपासून पाणी नाही. पाणी विकत घेऊन जीव मेटाकुटीला आला आहे. लासलगाव सोडून दुसरीकडे राहण्यास जावे, असे आता वाटायला लागले आहे." -स्मिताताई कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या

"पाणी रोजच्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. दीड महिना झाला, तरी नळाला पाणी नाही. मोलमजुरीचा सर्व पैसा पाणी विकत घेण्यावर चालला आहे. नळाला न येणाऱ्या पाण्याची बिले मात्र नियमित पाठवली जातात. पाण्याच्या रोष मतपेटीतून दिसेल."

-शोभा कर्पे, मोलमजुरी करणारी महिला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : ...अन्यथा थेट कार्यक्रम करेन; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

Donald Trump: रिपब्लिकन पक्षाचा नेता अमेरिकेचा राष्ट्रध्यक्ष झाला; आठवलेंनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, भारत...

Mephedrone Case : मेफेड्रोन उत्पादन प्रकरणाचा खटला सुरू; ललित पाटीलसह २२ आरोपींवर गुन्हा दाखल

Video: “कोण आहेत हे, यांचं नाव घेऊन ठेवा”; मविआच्या सभेपूर्वी उद्धव ठाकरे पोलिसांवर भडकले

Yuvraj Singh, मोहम्मद कैफसह तेंडुलकरही आयपीएल लिलावात उतरणार; जाणून घ्या किती आहे मूळ किंमत ?

SCROLL FOR NEXT