student at military school esakal
नाशिक

नव्याने मंजूर 10 सैनिकी शाळांमधील प्रवेशास इ- कौन्सिलिंग संकेतस्थळ सुरू

महेंद्र महाजन

नाशिक : नव्याने मंजुरी मिळालेल्या १० सैनिकी शाळांमध्ये (military schools) प्रवेश घेण्यासाठी प्रक्रिया समजून घेण्यासाठी इ- कौन्सिलिंगच्या (e counseling) दुसऱ्या फेरीसाठी संकेतस्थळावर (Website) पुन्हा सुरु करण्यात आले आहे. दुसऱ्या फेरीत या सैनिकी शाळांमध्ये ५३४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सैनिकी शाळांमध्ये प्रवेशास मार्गदर्शन तथा समुपदेश https://sainikschool.ncog.gov.in/ecounselling या संकेतस्थळावर २६ जून २०२२ पर्यंत उपलब्ध असेल. (Launch of e counseling website for admissions in 10 newly sanctioned military schools Nashik Educational News)

राष्ट्रीय चाचणी संस्था एन. टी. ए. ने घेतलेल्या राष्ट्रीय सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेले सर्व पात्र विद्यार्थी, ज्यांनी पहिल्या फेरीच्या इ- कौन्सिलिंगसाठी नोंदणी केली होती, ते दुसऱ्या फेरीसाठी पात्र असतील. मात्र याला काही अपवाद आहेत. ते असे : ज्या विद्यार्थ्यांना यापूर्वी सैनिकी शाळेत प्रवेश मिळाला आहे (सध्याच्या अथवा नव्याने सुरु होणाऱ्या). ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत त्यांनी दिलेल्या प्राधान्य अथवा पसंतीक्रमाच्या बाहेरच्या शाळांमध्ये प्रवेश मिळाला आहे, मात्र त्यांनी त्याला अजिबात प्रतिसाद दिलेला नाही. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला असूनही, त्यांनी त्यासाठी उत्सुकता दर्शवलेली नाही.

पहिल्या फेरीत ज्यांना त्यांच्या पसंतीच्या शाळेत प्रवेश मिळाला असून, त्यांनी तिथे जाण्याची इच्छाही दर्शवली आहे. मात्र अद्याप प्रवेश शुल्क भरलेले नाही. असे सगळे वगळता इतरांना दुसऱ्या फेरीच्या इ.-समुपदेशनात प्रवेश घेता येईल. दुसऱ्या फेरीत प्रत्येक पात्र विद्यार्थी त्याच्या पसंतीच्या तीन शाळा सांगू शकतात. प्रत्यक्ष पडताळणी आणि प्रवेश शुल्क भरण्याची तारीख लवकर पोर्टलवर अपलोड केली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT