Leakage in Malegaon main water channel  esakal
नाशिक

Nashik News : मालेगावला मुख्य जलवाहिनीत गळती; 4 लाख लिटर पाण्याचा अपव्यय

शहरातील ओवाडी नाल्याजवळील मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या कामासाठी वॉश आउट व्हॉल्व्ह दोन ठिकाणी उघडल्याने मुख्य जलवाहिनीतून पाणीगळती झाली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरातील ओवाडी नाल्याजवळील मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या कामासाठी वॉश आउट व्हॉल्व्ह दोन ठिकाणी उघडल्याने मुख्य जलवाहिनीतून पाणीगळती झाली. दुरुस्तीच्या कामासाठी चार लाख लिटर पाण्याचा अपव्यय झाला.

तथापि या संदर्भात तांत्रिक माहिती नसल्याने व लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे पाहून सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे व सहकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.(Leakage in Malegaon main water channel nashik news)

शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू असताना वाया जाणाऱ्या पाण्याचे प्रशासनाला गांभीर्य नसल्याचा आरोप श्री. बोरसे यांनी केला. आयुक्त रवींद्र जाधव, पाणीपुरवठा अभियंता व कर्मचाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत त्यांना वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली.

ओवाडी नाल्याजवळील जलवाहिनीच्या व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या कामात पाण्याच्या दाबामुळे अडचणी येत होत्या. जलवाहिनी रिकामी करण्यासाठी वॉश आउट व्हॉल्व्ह उघडल्याने हे पाणी वाया गेले. दुरुस्तीसाठी अन्य दुसरा पर्याय नव्हता.

तीन दिवसांआड पाण्यामुळे महिलांची वणवण

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा पंपिंग स्टेशनजवळील दहीवाळ एक्स्प्रेस फीडरवरील तांत्रिक कामे व दुरुस्तीसाठी एक्स्प्रेस फीडरवरील वीजपुरवठा शनिवारी (ता. २०) खंडित झाला होता. या कामामुळे शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळित झाला होता. फीडर दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाला पाणीपुरवठ्यासाठी शटडाउन करावे लागले होते.

यामुळे शनिवार व रविवारचा पाणीपुरवठा विस्कळित झाला. शनिवारचा (ता. २०) पाणीपुरवठा रविवारी होणार होता. यातच सायने जलशुद्धीकरण केंद्राजवळील व्हॉल्व्ह रविवारी नादुरुस्त झाल्याने सलग तिसऱ्या दिवशीही रविवारचा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. मनपाने आवाहन केल्यानंतर शहरवासीयांनी किमान तीन दिवस पाणी पुरविले.

रविवारी बहुसंख्य घरांमध्ये पाण्याचा ठणठणात होता. त्यातच रविवार सुटीचा दिवस असल्याने महिलांची पाण्यासाठी वणवण झाली. रविवारचा पाणीपुरवठा व्हॉल्व्ह दुरुस्तीसाठी किमान दहा ते अकरा तास विलंबाने होणार आहे. यामुळे सोमवारी (ता. २२) होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही विपरीत परिणाम होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT