SIILC  esakal
नाशिक

Nashik News : शिका आधुनिक प्रॉडक्ट पॅकेजिंगचे विविध प्रकार; नाशिकमध्ये 15 एप्रिलला एकदिवसीय विशेष प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : प्रॉडक्टचे पॅकिंग आकर्षक असेल तर ग्राहकही आवर्जून पसंती देतात. मात्र पॅकिंगमधील बहुतांश भाग हा मटेरिअलवर अवलंबून असतो व प्रॉडक्टनिहाय पॅकींगच्या मटेरिअलमध्येही बदल करावा लागतो.

असे हे विविध प्रकारचे पॅकिंग मटेरिअल कसे बनवितात, त्यासाठी कोणत्या मशिनरी लागतात, छोटे पॅकेजिंग युनिट सुरू करण्यासाठी अंदाजे किती गुंतवणूक करावी लागते इ. विषयी मार्गदर्शन करणारे एकदिवसीय विशेष प्रशिक्षण शनिवार (ता.१५) रोजी सकाळ- ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसी तर्फे त्र्यंबक रोडवरील सकाळ कार्यालयात आयोजिले आहे. (Learn different types of modern product packaging One day special training on April 15 in Nashik News)

मुंबईस्थित पॅकेजिंग क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ व ॲग्रोवनचे लेखक शैलेश जयवंत हे या प्रशिक्षणाला मार्गदर्शन करणार आहेत. ज्यांना पॅकेजिंगमध्ये स्टार्ट अप करायचे आहे तसेच पॅकेजिंग युनिट असून त्यांना यातील अद्ययावत तंत्रज्ञान जाणून घ्यावयाचे आहे इ.साठी प्रशिक्षण फायदेशीर आहे.

प्रशिक्षणात प्रत्यक्ष पॅकेजिंग मशिनरी बघण्याची संधी असणार आहे. प्रति व्यक्ती १५०० रुपये शुल्क आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ९२८४७ ७४३६३

प्रशिक्षणातील विषयः

- पॅकेजिंगचे विविध प्रकार

- इंडस्ट्रीनिहाय पॅकेजिंग

- पॅकिंग मटेरिअल बनविण्याची पद्धती

- आवश्यक यंत्रसामग्री

प्रशिक्षण दिनांक : ता.१५ एप्रिल २०२३

ठिकाण : सकाळ कार्यालय, सातपूर एमआयडीसी, त्र्यंबक रोड, नाशिक

वेळ :सकाळी १० ते सायंकाळी ५

शुल्कः प्रति व्यक्ती दीड हजार रुपये

नावनोंदणीसाठी संपर्क : ९२८४७ ७४३६३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT