Shahir Swapnil Dumbre esakal
नाशिक

Passion: इंजिनिअरिंगची नोकरी सोडून जपला ‘शाहिरी बाणा’! सिन्नरच्या शाहीर स्वप्नीलची पोवाड्यांतून जनजागृती

सकाळ वृत्तसेवा

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

Passion : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची यशोगाथा पोवाड्यांच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवणारा सिन्नरचा स्वप्नील डुंबरे हा महाराष्ट्रात युवा शाहीर म्हणून नावारूपास आला आहे.

इंजिनिअरिंग क्षेत्रातील नोकरी सोडून शाहीर होण्याचा छंद जिवापाड जपत त्याने आपली कला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. केवळ व्यावसायिक कार्यक्रमच नव्हे तर शेतकरी आत्महत्या, बेटी बचाव बेटी पढाव यासारख्या सामाजिक विषयातून समाजजागृती घडवण्याचे काम त्याने हाती घेतले आहे. (Leaving engineering job swapnil dumbre pick passion of Shahiri Bana Sinnar public awareness through powadas nashik news)

सिन्नरला प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वप्नीलने के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदविका पूर्ण केली. त्यानंतर नोकरी मिळाली व त्याच कालावधीत विवाह झाला.

शाळा, महाविद्यालयातील सार्वजनिक कार्यक्रमांत गाणी म्हणण्याचा गूण कायम असल्यामुळे तो शांत बसू देत नव्हता. पण घरात कलेचा कुठलाही वारसा नाही. आई- वडील दोघेही शिक्षक होते. त्यामुळे घरातून शाहीर होण्यासारखी यत्किंचितही परिस्थिती नव्हती.

एका कार्यक्रमानिमित्त मित्रांसोबत गेल्यानंतर तिथे पोवाडा ऐकण्याची संधी मिळाली. मलाही पोवाडा गाता येतो, हे मित्रांना सांगितले. पण त्यांनी काही ऐकले नाही. फक्त बोलत बसण्यापेक्षा करून दाखव, असे आव्हानच त्यांनी मला दिले.

त्यानंतर सिन्नर येथील शिवाजी चौकात पहिला कार्यक्रम झाला. त्यानंतर आमच्या स्वरशंभू प्रबोधनात्मक शाहिरी कलामंचने मागे फिरून बघितलेच नाही. महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी या कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

शाहिरी लोककलेच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास सांगताना शिवरायांचे बालपण, राजापाटलाचा प्रसंग, स्वराज्याची स्थापना, जावळीचे खोरे, अफजलखानाची झुंज, कोंडाणा किल्ला सर करण्याचे प्रसंग प्रेक्षकांसमोर जिवंतपट उभा करतात. त्यामुळे स्वप्नीलच्या कलेचे सर्वत्र कौतुक होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शिवाय पुरस्काररूपी प्रोत्साहनही मिळत राहते. कालिरमन फाउंडेशन, इंडियातर्फे राष्ट्रीय कोहिनूर पुरस्कार, मातोश्री हिराबाई मुक्तेश्वर सेवाभावी संस्थेचा फिनिक्स पुरस्कार, महात्मा जोतिराव फुले कला पुरस्कार, लोकशाहीर वामनदादा कर्डक पुरस्कार, छावा संघटनेतर्फे शाहीररत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज जागृती घडवण्याचे कार्य आजही त्याच उमेदीने जोपासत असल्याचे शाहीर स्वप्नील डुंबरे आवर्जून सांगतो.

लग्न सोहळ्यात शाहिरांचा पोवाडा

लग्न सोहळ्याचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत असल्याने आता शाहिरी पोवाडेही गायले जातात. त्यासाठी शाहीर स्वप्नील डुंबरे यांच्या कलामंचला निमंत्रण येतात. सुरवातीला अशा कार्यक्रमांना नकार देणाऱ्या या कलामंचने आता लग्नसोहळ्यांमध्येही आता डफावरची थाप मारण्यास सुरवात केली.

वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या वऱ्हाडी मंडळींना शिवरायांचा पोवाडा ऐकण्यात रस असल्याचे त्यांच्या प्रतिसादावरून दिसून येत असल्याचे स्वप्नील याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत दुबईत आला पैसा, क्रिप्टोकरन्सीद्वारे बेकायदा फंडिंग; भाजपचा मविआवर खळबळजनक आरोप

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र नोंदवेल का ६५ टक्के मतदान? दहा वर्षांपासून ६० टक्केच नोंद

Women’s Asian Champions Trophy: भारतीय संघाची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक; जपानला सेमीफायनलमध्ये केलं पराभूत

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही

SCROLL FOR NEXT