Professionals selling Shorma in Sardarnagar.  esakal
नाशिक

Nashik Shawarma Business: लेबनानचा शोरमा शहरवासीयांना घालतोय भुरळ! 5 वर्षांपासून 20 दुकानांतून होतेय विक्री

अल्पावधीतच शोरमा अनेकांच्या पसंतीस उतरून लोकप्रिय झाला आहे. शहरात चिकनपासून शेकडो प्रकार बनविले जातात

जलील शेख

मालेगाव : शहरात चिकन, मटण, बीफ यांसह मांसाहराचे शेकडो प्रकार आहेत. येथे मांसाहार करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पिझ्झा, बर्गर, चायनीज, पास्ता यापाठोपाठ लेबनानमधील शोरमाने शहरवासीयांना भुरळ घातली आहे.

अल्पावधीतच शोरमा अनेकांच्या पसंतीस उतरून लोकप्रिय झाला आहे. शहरात चिकनपासून शेकडो प्रकार बनविले जातात. यात शोरमाची भर पडली आहे. (Lebanese Shawarma tempting city dwellers Selling from 20 shops for 5 years Nashik News)

शहरात पाच वर्षांपासून शोरमा विकला जात आहे. सुरवातीला त्याला कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत होता.

सध्या शहरात शोरमा विक्री करणारी वीस दुकाने असून, येथे सरदारनगर, अंजुमन चौक, आग्रा रोड, अब्दुलाहनगर, नूरबाग, आझादनगर यांसह विविध भागांत दुकाने आहे. एका दुकानात सुमारे पंधरा किलो बोनलेस चिकन विकले जात असल्याचे येथील दुकानदारांनी सांगितले.

देशातील साउथमधील बहुतेक कामगार हे परदेशात कूक म्हणून काम करतात. त्यामुळे विदेशातील अनेक प्रकार भारतात आले आहे.

सुरवातीला हैदराबाद, दिल्ली व साउथ इंडियन, मुंबई या मोठ्या शहरात शोरमा बनविला जात होता. हळूहळू संपूर्ण देशात शोरमा विक्रीसाठी दिसत आहे. कमी खर्चात हा व्यवसाय सुरू होत असल्याने अनेक तरुण हा व्यवसाय करताना दिसत आहे.

चीझ, सेझवान, पेरीपेरी मसाला, प्लेटर, सलाद व कोबी, देशी तडका आदी टाकून शोरमा बनविला जातो. पन्नास ते शंभर रुपयांपासून शोरमा विकला जातो. यात सर्वात जास्त पन्नास रुपये किंमतीच्या शोरमाला पसंती दिली जाते.

शोरमा बनवितांना यात बोनलेस चिकनचा वापर होतो. मैद्यापासून तयार केलेली रोटी (खुबुस) या रोटीत चिकनला बारीक कट करून त्यात चटणी व चीझ टाकून रोल तयार केला जातो. शोरमामधील मयोनीज या प्रकाराला महिला, मुले, युवा वर्गाकडून पसंती दिली जात आहे.

"शोरमामुळे अनेक तरुण व्यवसायात उतरले आहेत. अनेकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. सुरवातीला मुंबई येथील कारागीर आले होते. त्या कारागिरांपासून येथील मुलांनी प्रशिक्षण घेऊन दुकाने सुरू केली."- आकीब अहमद शोरमा विक्रेता, सरदारनगर, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT