A tractor and a stolen trolley stuck in Samriddhi's protective fence along the Maldhon-Mirgaon road. esakal
नाशिक

Nashik Crime: ट्रॉली चोरणे आले अंगलट; नवा कोरा ट्रॅक्टर फसल्यामुळे चोरट्यांना काढावा लागला पळ

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : घरासमोर उभी असलेली ट्रॉली रात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी चोरली. सोबत आणलेल्या नव्या कोऱ्या ट्रॅक्टरला जोडून ट्रॉली घेऊन जात असताना, वस्तीवरील नागरिकांना जाग आली.

तरुणांनी दुचाकीवरून चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. हा पाठशिवनीचा खेळ चोरट्यांना चांगलाच महागात पडला.

समृद्धी महामार्गाच्या संरक्षक भिंती तोडून चोरलेली ट्रॉली आणि ट्रॅक्टर लपविण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, ट्रॅक्टर फसल्यामुळे त्यांना बचावासाठी पळ काढावा लागला. (left of trolley caught thieves had to flee as new Kora tractor got stuck Nashik Crime)

चित्रपटातील कथानकाला साजेसा हा प्रकार सिन्नर तालुक्यातील मलढोण गावात घडला. वामन राजाराम सरोदे (वय ६७) यांच्या मालकीची ट्रॅक्टरची निळ्या रंगाची ट्रॉली घरासमोर उभी होती. चोरट्यांनी ही ट्रॉली चोरून नेण्यासाठी नवा कोरा ट्रॅक्टर सोबत आणला.

ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून ती घेऊन जात असताना, आवाजामुळे वस्तीवरील रहिवाशांना जाग आली. ट्रॅक्टरमध्ये असलेले तिघे ट्रॉली चोरून नेत असल्याचा प्रकार पाहून एकच कल्लोळ झाला. आजूबाजूच्या वस्त्यांवरील तरुण मदतीला धावले.

चोरटे ट्रॅक्टर व ट्रॉली घेऊन मलढोण-मीरगाव रस्त्याने जाऊ लागले. पाठीमागून दोन- चार दुचाकी त्यांचा पाठलाग करीत होत्या. समृद्धी महामार्ग ओलांडत असताना, अंडरपासलगत असलेल्या सिमेंट पडदीचे संरक्षक कुंपण तोडत ट्रॅक्टर आत वळविण्यात आला.

ट्रॅक्टर आणि ट्रॉली तेथून जवळच असलेल्या शिवरस्त्याने वावीच्या दिशेला नेण्याचा चोरट्यांचा डाव असावा. मात्र, तेथे खोदलेल्या नालीमुळे ट्रॅक्टर फसला आणि चोरट्यांना ट्रॅक्टरसह चोरलेली ट्रॉली जागेवर सोडून पलायन करावे लागले.

पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. कदाचित समृद्धी महामार्गालगतच्या शेतांमधून ते परागंदा झाले. याबाबतची माहिती वावी पोलिस ठाण्यात दिल्यानंतर रात्र गस्तीपथकातील पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, सहाय्यक उपनिरीक्षक सोनवणे व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रात्री ट्रॅक्टर बाहेर काढणे शक्य नसल्यामुळे सकाळी ट्रॅक्टर ट्रॉलीसह वावी पोलिस ठाण्यात आणला. श्री. सरोदे यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ट्रॅक्टर मालक व त्याच्या पराक्रमाची चर्चा सकाळपासूनच होती. ट्रॅक्टर वावी येथील असून, महिनाभरापूर्वीच तो विकत आणला आहे. ट्रॅक्टर मालकाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने ट्रॉली चोरण्याचा प्रयत्न केल्याची उघड चर्चा आहे.

ट्रॅक्टर मालकास पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणले होते. त्यास ट्रॉली चोरीच्या गुन्ह्याखाली ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. ट्रॅक्टरसोबत तिघे चोरटे असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने संबंधितांकडे चौकशी केली.

मात्र, उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना ऐकावी लागली. दरम्यान, ट्रॅक्टर मालकाने ट्रॉलीच्या मालकाची भेट घेत माफी मागत गुन्हा न दाखल करण्याची विनवणी केल्याची चर्चा सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT