Lemons plucked in Prakash Hallij's garden esakal
नाशिक

Lemon Price Hike : उन्हाच्या चटक्याने लिंबू महागला! मालेगावला किरकोळ बाजारात 10 रुपयाला 2 लिंबू

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : येथील भाजीपाला बाजारात लिंबूची आवक वाढली आहे. उन्हाचे चटके बसताच लिंबूचे भाव देखील वाढू लागले आहेत. येथे रोज शंभर कॅरेट लिंबू विक्रीसाठी येत आहेत. घाऊक बाजारात लिंबूला १२० रुपये किलोचा दर मिळत आहे.

किरकोळ बाजारात दहा रुपयाला दोन लिंबू मिळत आहेत. मुबलक पाणी उपलब्ध असल्याने या वर्षी लिंबूच्या उत्पादनात वाढ झाली आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर लिंबूचे भाव वाढण्याची शक्यता आहे. (Lemon became expensive due to hot summer 2 lemons for 10 rupees in Malegaon retail market nashik news)

शहर व परिसरात उन्हाचा चटका वाढल्याने रसवंती, लिंबू सरबत, लिंबू शिखंजी, सोडा यासह विविध दुकाने थाटण्यात आली आहेत. परिणामी लिंबूची मागणी वाढल्याने पंधरा दिवसापासून भाव तेजीत आले आहेत.

शहरात रमजान पर्व सुरु झाल्याने मुस्लीम बांधव उपवास सोडण्यासाठी लिंबूचा वापर करतात. येथील भाजीपाला बाजारात गेल्या वर्षी मार्चमध्ये लिंबूचे साठ कॅरेट येत होते. यावर्षी ही संख्या शंभर कॅरेटवर पोहोचली आहे. किरकोळ बाजारात लिंबू दहा रुपयाला दोन मिळत आहेत.

एप्रिल-मे महिन्यात लिंबूचे दर दोनशे रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. गेल्यावर्षी लिंबू चार हजार रुपये कॅरेटपर्यंत गेला होता. यावर्षी उत्पादनात वाढ झाल्याने अडीच हजार रुपये कॅरेटप्रमाणे लिंबू विकला जात आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

येथील घाऊक बाजारात लिंबू स्वस्त असल्याने नाशिक, धुळे येथे विक्रीसाठी जात आहेत. सध्या पारा ३५ अंशाच्या खाली आहे. ४० अंशावर तापमान गेल्यास रसवंतीगृहांसह इतर शीतपेयांच्या दुकानांमध्ये गर्दी वाढेल. यानंतर भाव वाढण्याची अपेक्षा उत्पादक बाळगून आहेत.

"एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत लिंबूचे दर वाढण्याची अपेक्षा आहे. ऊन वाढल्यामुळे शेतकरी कच्चा माल काढीत आहेत. उन्हामुळे लिंबूचा आकार मोठा होत नाही. यावर्षी अवकाळी पावसामुळे लिंबूची फुलगळ झाली. मुबलक पाणी असल्याने उत्पादन वाढून लिंबूची आवक वाढली आहे. लिंबूला किमान तीन हजार रुपये कॅरेटपेक्षा अधिक भाव मिळाला तरच परवडते."

- प्रकाश ह्याळीज, लिंबू उत्पादक, कुकाणे

"येथील भाजीपाला बाजारात लिंबूची आवक वाढली आहे. रमजान महिना असल्याने येथे मुबलक माल विक्रीसाठी येत आहे. अद्याप पुरेसे ग्राहक नाहीत. एप्रिल अखेरपर्यंत मागणी वाढून लिंबूचे भाव वाढू शकतील."- कृष्णा बाणे, लिंबू विक्रेता, मालेगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT