Laopard caught in CCTV esakal
नाशिक

Nashik News: आडगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; घटनेचा थरार CCTVत कैद

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आडगाव परिसरात असलेल्या प्रभाकर माळोदे यांच्या बंगल्याच्या आवारात बिबट्याने मंगळवार (ता. २५) रोजी रात्री साडेअकराला प्रवेश करीत त्यांच्या पाळीव कुत्र्यावर केला.

त्याचवेळी दुसरा कुत्रा जागा होऊन त्याने बिबट्यावर हल्ला करीत त्याला पळून जाण्यास भाग पाडले. हे दृश्य तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. (Leopard attack in Adgaon area incident caught on CCTV Nashik News)

आडगाव शिवारात रात्री बाहेर कुत्र्यांच्या ओरडण्याचा आणि नंतर भुंकण्याचा आवाज आल्याने माळोदे कुटुंबीय बाहेर आले. तेव्हा दोन्ही कुत्री जोरजोराने भुंकत होती. त्यांच्या लॅब जातीच्या शेरू या कुत्र्याच्या मानेजवळ जखम झाल्याचे दिसत होते.

त्यावरून बिबट्या आल्याचे संशय आल्याने त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा तपासला असता त्यात बिबट्या भिंतीवरून सावकास बंगल्याचा आवारात उतरलेला दिसत आहे. तेथून तो अलगद चालत शेरू झोपलेला होता तेथे आला.

बिबट्याने शेरुची मान पकडण्याचा प्रयत्न करताच तो ओरडल्याने बाजूला खुर्चीवर झोपलेल्या सिम्बा या गावठी कुत्र्याला जाग आली, तो थेट बिबट्यावर चाल करून गेला. त्याने बिबट्याच्या पाय पकडला त्या झटापटीत बिबट्याने शेरूला सोडून दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सिम्बा बिबट्याच्या मागे धावत गेला. कुत्र्यांनी केलेला प्रतिहल्ला बघून बिबट्या पळाला आणि तो पुन्हा कुत्र्यांच्या दिशेने धावत आला. काही काळ तेथे रिंगाळला आणि बाजूला जाऊन पुन्हा आला. दोन्ही कुत्री त्याच्यावर भुंकत पळत होती.

सुमारे अडीच मिनिटे हा थरार सुरु होता. अखेर बिबट्याने भिंतीवरून उडी घेत बाहेर निघून गेला. कुत्र्यांच्या आवाजाने जागे झालेल्या माळोदे कुटुंबियांना काय घडले हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तपासले असताना ही सर्व प्रकार त्यात कैद झाल्याचे दिसले.

सिम्बाने दाखविलेल्या हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या परिसरात वनविभागाने पिंजरा बसवावा अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT