Leopard cubs found at Said settlement near 36 Chari in Chichondi Khurd esakal
नाशिक

Nashik News: चिचोंडी खुर्द येथे आढळले बिबट्याचे बछडे; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : चिचोंडी खुर्द (ता.येवला) येथील चारी नंबर ३६ जवळील दत्तू सैद यांच्या शेतात आज सकाळी बिबट्याचे बछडे आढळून आल्याने चिचोंडी खुर्द परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान बछडे आढळल्याने याच परिसरात मादी (बछड्याची आई) असण्याची शक्यता आहे. येथील प्राणीमित्र योगेश चव्हाणके यांनी वनविभागाला सदर माहिती कळवली.

वनविभागाचे वन परिक्षेत्र आधिकारी अक्षय मेहत्रे यांनी तात्काळ भेट देत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. (Leopard cub found in Chichondi Khurd climate of fear among citizens Nashik News)

दरम्यान बिबट्याच्या पिल्ला जवळ कोणी जाऊ नये. त्याला हात लावू नये तसेच सकाळ, संध्याकाळी आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावी असे आवाहन विभागाने केले आहे.

वनविभागाचे अक्षय मेहेत्रे, वनपाल राठोड, नागपुरे आदींनी पाहणी करून या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले असून बिबट्याची मादी आढळून आल्यास या ठिकाणी पिंजरा लावला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान पारेगाव पच्छिम भाग व चिचोंडी खुर्दच्या पूर्व परिसरातील नागरिकांनी काळजी घेण्याची आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी बापू सैद, दत्तू सैद, प्रमोद सैद हे ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT