A female leopard died in a fight with Dusangwadi dogs. esakal
नाशिक

Nashik News : शिकारी खुद यहाँ शिकार हो गया; बिबट्याची मादी कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कुत्रा हा सर्वांत इमानदार व प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखला जातो. आपल्या मालकाने टाकलेल्या विश्‍वासाला सार्थ करण्यासाठी प्रसंगी जिवाचीही पर्वा न करता लढणाऱ्या या प्राण्याच्या अनेक कथा प्रचलित आहेत.

अशीच एक घटना शनिवारी (ता. १३) रात्री दुसंगवाडी (ता. सिन्नर) येथे घडली. यामध्ये सावज टिपण्यासाठी मेंढरांच्या कळपात शिरलेल्या बिबट्याच्या मादीचा संरक्षक कुत्र्यांनी फडशा पाडला. (Leopard female killed in dog attack at sinnar Nashik News)

दुसंगवाडी येथील भास्कर गोराणे व नंदराम गोराणे यांच्या मेंढ्यांचा कळप गावातीलच साईनाथ कासार यांच्या शेतात वस्तीला आहे. वाघूळ लावून या सर्व मेंढ्या गोराणे यांनी संरक्षित केल्या होत्या. रात्री दहाच्या सुमारास हे वाघूळ तोडून बिबट्याने कळपावर हल्ला चढवला.

मात्र, कळपासोबत असलेल्या तीन कुत्र्यांनी जोरदार प्रतिकार करत बिबट्याला जखमी केले. यादरम्यान जीव वाचवण्यासाठी पळालेला बिबट्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकीवर जोराने धडकल्याने बेशुद्ध झाला.

विशेष म्हणजे या हल्ल्यात एकही मेंढी जखमी झाली नाही. मेंढपाळ शेतकऱ्यांनी ही घटना सरपंच कानिफनाथ घोटेकर यांना कळविली. श्री. घोटेकर यांनी सिन्नरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांना सूचित करतानाच स्थानिक पशुवैद्यकांना बोलावले.

मात्र, पूर्ण वाढ झालेला बिबट्या प्रतिकारासाठी उभा राहिला तर? या भीतीने कोणीही त्याच्याजवळ जायची हिंमत करत नव्हते. मध्यरात्री बाराच्या सुमारास सिन्नरहून वन विभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी आल्यानंतर बिबट्याला तातडीने मोहदरी येथील वनउद्यानात नेण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र, तेथे पोचण्यापूर्वीच बिबट्या मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रविवारी (ता. १४) सकाळी शवविच्छेदन व पंचनामा करून बिबट्यावर वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या आदेशाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, वावी, मीठसागरे व पिंपरवाडी या गावांच्या सीमेवर दोन दिवसांपासून एका भारदस्त बिबट्याचे दर्शन होत आहे. वावीच्या देवी मंदिर परिसरातील फापाळे वस्ती, भोसले वस्ती, संधान वस्ती, भोपी वस्ती या भागात बिबट्याने जवळून दर्शन दिले.

फापाळे वस्तीवरील कुत्र्याला सर्वांच्या डोळ्यादेखत ओढत नेऊन त्याचा फडशा पाडला. परिसरात मोरांनादेखील या बिबट्याने सावज बनविले आहे. या भागात हरणांची संख्या मोठी असून, त्यांनादेखील बिबट्यापासून धोका संभवतो.

त्यामुळे शनिवारी सायंकाळी वनपरिक्षेत्राधिकारी मनीषा जाधव, वनरक्षक अनिल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात पिंजरा लावण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: फुलंब्री विधानसभा संघात अनुराधा चव्हाण 28900 मताने आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT