Leopard found dead in Mahale farm mystery of death remains clear after autopsy esakal
नाशिक

Nashik Leopard News: महाले मळ्यात बिबट्या आढळून आला मृतावस्थेत! मृत्यचे गूढ कायम; शवविचछेदनानंतर होईल स्पष्ट

बिबट्याचा मृत्यू कसा झाला हे गूढ कायम असून शवविचछेदनानंतर स्पष्ट होईल, असे वनरक्षक सचिन आहेर यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : शहर परिसरात बिबट्यांचा वावर ही काही नवीन बाब नाही. मखमलाबाद शिवारातील मळे परिसरात देखील बिबट्यांचा वावर हा नित्याचा आहे. महाले मळ्यात मंगळवार (ता.२६) रोजी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना घडली आहे.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत बिबट्याचा घटनास्थळ पंचनामा केला असून शवविचछेदनास घेऊन गेले. दरम्यान बिबट्याचा मृत्यू कसा झाला हे गूढ कायम असून शवविचछेदनानंतर स्पष्ट होईल असे वनरक्षक सचिन आहेर यांनी सांगितले. (Leopard found dead in Mahale farm mystery of death remains clear after autopsy Nashik News)

मखमलाबाद परिसरातील गंगापूर कॅनॉल,जुना चांदशी रस्त्यावरील काकड मळे परिसर , महाले मळा आदी भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. या भागातील अनेक कुत्री, वासरू, गायींचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू झाला आहे.

मळे भागात बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवार( ता.२४) रोजी मध्यरात्री याच रस्त्यावरील थोरात मळ्यातील दीपक थोरात यांचे तेरा महिन्याच्या गायीचा बिबट्याने फडशा पाडला.

पंधरा ते वीस दिवसांमध्ये ही याच भागातील दुसरी घटना घडली. थोरात यांची गाय बिबट्याच्या हल्यात मृत्युमुखी पडत नाही तोच याच भागातील थोरात यांच्या मळ्याशेजारी महाले यांच्या शेतातील बांधावर सोमवार (ता.२५ ) रोजीच्या मध्यरात्री सुमारास बिबट्या मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

बिबट्या बांधावर पडलेल्या अस्वस्थेत महाले यांच्या शेतात काम करणाऱ्याला दिसला . तोही घाबरून गेला परंतु बराच वेळ होऊन बिबट्या हालचाल करत नसल्याने त्याने जवळ जाऊन बघितले असता तो मृत्युमुखी पडल्याचे दिसले.

त्या मयत बिबट्याचा फोटो व्हायरल झाल्याने नाशिक प्रादेशिक परिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे यांना माहिती कळविल्यानंतर त्यांनी वनरक्षक सचिन आहेर यांना घटनास्थळी पाठविले.

याठिकाणी सचिन आहेर, वनकर्मचारी सोमनाथ निंबेकर , पांडुरंग खाडे यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृत बिबट्याला शिवविच्छेदना करता घेऊन गेले.

या घटनेची माहिती म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजू पाचोरकर , पोलिस उपनिरीक्षक रमेश घडवजे व कर्मचारी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

शवविच्छेदन अहवालानंतर समजेल मृत्यूचे गूढ

"मखमलाबाद परिसरातील महाले यांच्या शेताच्या बांधावर मृत्युमुखी पडलेला बिबट्या हा नर असून त्याचे वय साधारण ७ ते ८ वर्ष असून घटनास्थळी पंचनामा करून त्याच्या शवविच्छेदनानंतर त्याचा मृत्यू कशाने झाला ते स्पष्ट होईल. शवविच्छेदनानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर अंत्य संस्कार करण्यात येतील."

- सचिन आहेर, वनरक्षक , नाशिक

पिंजरा बसविण्याची मागणी

गेल्या काही दिवसांपासून मखमलाबाद परिसरातील जुना चांदशी रस्त्यावरील काकड मळे परिसर , गंगापूर कॅनॉल, महाले मळा आदी परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असल्याने शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे. रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना आपल्या घरी जाताना भीती वाटत असते. त्यामुळे याभागात वनविभागाने पिंजरा बसविण्याची मागणी केली जात आहे.

ग्रामस्थांची गर्दी, अन् फोटो सेशन

बिबट्याचे नाव ऐकताच किंवा समोर बघताच भल्या भल्यांची गाळण उडते. मात्र मखमलाबाद गावातील महाले यांच्या मळ्यात बिबट्या मृत्युमुखी पडल्याचे माहीत पडताच गावातील ग्रामस्थ आणि शेतकरी महाले यांच्या मळ्यात मृत्युमुखी पडलेला बिबट्या बघण्यासाठी एकच गर्दी केली होती.

अनेक युवक देखील गेले होते. याठिकाणी जात मयत बिबट्याचे फोटो, काढून फोटो सेशन करत होते. काही वेळात वणरक्षक सचिन आहेर आल्यानंतर बिबट्यावर कपडा टाकून झाकून ठेवला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Updates : अनिल देशमुख हल्ला प्रकरणाचं AI रिक्रिएशन; विशेष पोलिस महानिरिक्षकांची माहिती

IND vs AUS Viral Video: सर्फराजची कॅचवरून विराट कोहलीने उडवली खिल्ली; ऋषभ पंत तर हसून लोटपोट झाला

Assembly Election 2024 : एसटी बस निवडणूक कर्तव्यावर... प्रवासी स्टॅण्डवर, सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT