A male leopard caught in a forest department trap in the field of farmer Trimbak Bhangre esakal
नाशिक

Nashik Leopard News : नायगाव खोरेत वनविभागाच्या सापळ्यात अडकला बिबट्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील शिवारातील सायखेडा रस्त्यालगत पांदीचा ओहोळतील शेतकरी त्र्यंबक भांगरे यांच्या शेतात बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे. नाशिक पश्चिम विभागातील बिबट्या शोधा अन् पकडा मोहीमेला आठव्या दिवशी यश मिळाले आहे. वनखात्याच्या वन सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी बिबट्याच्या मायलेकरांची ताटातूट झाली आहे.

वनखात्याच्या गस्तीपथकाने पहिला बिबट्या पकडल्याबद्दल कौतुक केले आहे. मादीसह दोन बिछडे पैकी नर जातीचे बछडे वनविभागाच्या सापळ्यात अडकले आहे. वनविभागाने मंगळवारी (ता.3)ला नायगाव खोरे भागात बिबट्या शोधा अन् पकडा मोहीम सुरू केली.

त्यात एक आॅक्टोबर पासून वन्यजीव सप्ताह सुरू झाला.या भागात सहा पिंजरे उभारलेल्या नंतर बिबट्याने दोन घटनेत चार शेळ्यांची शिकार केली. ( leopard got caught in forest department trap in Naigaon Khore area nashik news)

त्यात सायखेडा रस्ताला पांदीचा ओहोळ भागात शेतकरी त्र्यंबक भांगरे यांच्या सोयाबीन ऊसाच्या शेतात शेळीची शिकार केली. सकाळ ने लक्ष वेधल्यानंतर शिंदे रस्ता चा पिंजरा काढून येथे उभारला. शेती गट नंबर 154 मध्ये सोमवारी (ता.10 ) सायंकाळी सहाला मक्याच्या शेतात मादीसह बिछडे पाहिले.

वनविभागाच्या कर्मचारी यांनी सर्वांना सुचत केले. रात्री दोनच्या सुमारास शेतकरी त्र्यंबक भांगरे यांच्या गोठ्यात जनावरे हंबरत होती. त्यावेळी त्यांनी बॅटरी प्रकाशात पाहिले तर त्यांना पिंजऱ्या भोवती दोन बिबटे फिरत होते.

पिंजऱ्यामधून डरकाळ्या त्यांना ऐकू आल्या. त्यांनी तात्काळ वनविभागाला कळविले. रात्रीचा पांदीचा ओहोळ डरकाळ्याने गर्जराला. बिबट्यांच्या मुक्त विहार करणारे आई मादी अन् तिचे बछडे यांची जोडी फुटली.

बिबट्या नर अडकल्यानंतर त्याला पिंजऱ्यातून मुक्त करण्यासाठी बिबट्या माय अन् लेकरू बछडे पिंजऱ्याला डरकाळ्या फोडून सारखी धडक देत होते. त्यातून सुटका होत नसल्याचे पाहून पहाटेच्या वेळी ऊसाच्या दिशेने मादीसह बिछडे गेले आहे. सकाळी साडे आठला अडकलेल्या बिबट्या पिंजऱ्यासह रेक्यू केले आहे.

बिबट्याची धास्ती कायम

नायगाव भागात ज्या बिबट्याने हल्ले केले. तो बिबट्या वनविभागाच्या हातीत लागला नाही. आठवडाभरापासून बिबट्या शोधा अन् पकडा मोहीम सुरू झाली. त्यांनतर या बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली नाही. हर्षल जेजूरकर मंगेश कातकाडे यांच्या शेतात मादीसह दोन बछडे मुक्त विहार करत होते. त्यातील नर जातीचा बिबट्या सापळ्यात आला. ही जोडी फुटल्यानंतर मादीसह तिचे बछडे पकडा असे नायगाव भागातील शेतकरी बांधवांनी संगितले आहे. ह्या भागात अजून तीन बिबटे असण्याची शक्यता आहे.

"रात्रीच्या आम्हाला झोपा नाही.शेती शिवारात वस्तांवर कुटूंबाचे सारखे पाहारा करावा लागत आहे.रात्री मादी सह दोन बिछडे पैकी एक बिबट्या अडकला आहे.बाकीचे दोन ऊसाच्या शेतात असतील.वनविभागाने पडलेला बिबट्या पिंजरा नेला.पण दुसरा पिंजरा लावला नाही"- त्र्यंबक भांगरे शेतकरी नायगाव

"वन सप्ताह सांगतेच्या दुसरा दिवस पहिला नर जातीचा बिबट्या सापळ्यात आला आहे.आमच्या मोहिमेला सर्वांच्या पाठबळामुळे यश मिळाले आहे"- संजय गिते वनरक्षक नायगाव

"वनविभागाच्या चार पिंजरा ने आण साठी नायगाव ग्रामपंचायतीने ट्रॅक्टर दिला आहे. आम्ही त्यांना सहकार्य करत आहे.बिबट्या एक हाती आल्याने थोडा मोहिमेबद्दल दिलासा मिळाला आहे".-निलेश कातकाडे ग्रामपंचायत सदस्य नायगाव

"नायगाव ला बिबट्यांचा पाच सहा आहे.शुंभो भगत यांच्या मळ्यात दुसरे दोन बिबटे दिसले.आज एक बिबट्या पकडला.पण सर्व बिबट्यांचा बंदोबस्त होईपर्यंत नायगाव दहशत मुक्त होणार नाही"-अरूण चव्हाण शेतकरी नायगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : 'तुम्ही मला आशीर्वाद दिला नसता, तर मी आमदार-मंत्री झालोच नसतो'; असं का म्हणाले मुश्रीफ?

"त्याने त्याच्या मुलाला एक फोन केलेला नाही" ; 'इस प्यार को..'फेम अभिनेत्रीचा एक्स नवऱ्यावर आरोप, म्हणाली...

Dhule City Assembly Constituency : अनिल गोटे शिवबंधनात; ठाकरेंनी दिला एबी फॉर्म! मातोश्रीवर प्रवेश; धुळे शहराची उमेदवारी

Donald Trump Vs Kamala Harris: अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक अटीतटीची

कलर्सच्या नव्या मालिकेचं प्रसारण रखडलं; प्रेक्षकांनी रोष व्यक्त करताच वाहिनीने मागितली माफी, पोस्ट करत लिहिलं-

SCROLL FOR NEXT