crop  esakal
नाशिक

Nashik News: जिल्ह्यातील 76 उत्पादक अडचणीत; 384 जैवउत्तेजक कंपन्यांचे परवाने रद्द

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: चुकीचा पत्ता दिला म्हणून ३८४ जैवउत्पादक कंपन्यांचे जी-२ प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय कृषी संचालकांनी घेतला आहे. यात नाशिक जिल्ह्यातील ७६ कंपन्यांचा समावेश असून, त्याविरोधात उत्पादक कंपन्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

रासायनिक खतांना पर्याय म्हणून जैवउत्तेजक उत्पादने घेतली जातात. त्यांना बायोस्टिम्युलेट असेही म्हटले जाते. २०२२ मध्ये कृषी संचालकांनी राज्यातील १४०० जैवउत्तेजकांना जी-२ प्रमाणपत्र दिले. (Licenses of 384 biostimulants companies canceled nashik news)

त्यांनी चुकीचा पत्ता दिला किंवा दिलेल्या पत्यावर कंपनी अस्तित्वात नाही, या कारणास्तव ३८४ कंपन्यांचे प्रमाणपत्र रद्द केले आहे. जैवउत्पादक प्रमाणपत्र हे खत नियंत्रण आदेश १९८५ मधील सर्व तरतुदींचे पालन करते. त्यातील अटी व शर्तींच्या आधारे कृषी संचालकांनी जैवउत्पादक कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी केली.

यात उत्पादकांकडे खतांच्या तपासणीची यंत्रणा अस्तित्वात नसल्याचे दिसून आले. उत्पादकांनी दिलेल्या पत्यावर कंपनी अस्तित्वातच नसल्याचे आढळून आले. त्यांचे जी-२ प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय कृषी संचालक विकास पाटील यांनी घेतला आहे. यात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या ७६ कंपन्यांचा समावेश आहे.

कारवाई एकतर्फी झाल्याचा आक्षेप

जैवउत्पादक कंपनीने दिलेला पत्ता चुकीचा वाटत असेल तर तिथे गेलेल्या अधिकाऱ्यांनी फोन, ई-मेलद्वारे माहिती द्यायला हवी. पण कुठलीही पूर्वसूचना न देताच परवाने रद्द करणे ही एकतर्फी कारवाई झाल्याचा आक्षेप उत्पादकांनी घेतला आहे. एकदा दिलेले जी-२ प्रमाणपत्र रद्द करण्याची तरतूद नसताना कृषी संचालकांनी कुठल्या नियमांच्या आधारे ते रद्द केले याविषयी माहिती नसल्याचे उत्पादकांनी म्हटले आहे.

"परवाने रद्द झाल्याने आम्हाला कायदेशीर लढाई लढावी लागेल. जैव उत्पादकांच्या खच्चीकरणाचा हा प्रकार आहे. शेतकऱ्यांसाठी हे फायदेशीर ठरत असल्याने केंद्र सरकारने त्यांना एफसीओ नियंत्रणाखाली आणले आहे." -विजय ठाकूर, अध्यक्ष (ऑरगॅनिक ॲग्रो मॅन्यूफॅक्चर असो.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT