yoga trainer chanchal mali esakal
नाशिक

International Yoga Day 2023 : ‘योगा’तून घडविले 8 हजार विद्यार्थ्यांचे आयुष्य; चंचल माळींकडून सकारात्मक बदल

सकाळ वृत्तसेवा

International Yoga Day 2023 : नकारात्मक विचारांनी ग्रासलेल्यांच्या जीवनात ‘योगा’च्या माध्यमातून चंचल माळी यांनी सकारात्मक बदल घडविला आहे. गेल्या आठ वर्षात त्यांनी शहरातील ८ हजार विद्यार्थी व नागरिकांना योगाचे प्रशिक्षण दिले.

विशेष म्हणजे योगाच्या बळावर त्या ‘पीएसआय’च्या अंतिम टप्प्यावर पोचल्या आहेत. (Life of 8000 students has been made through Yoga through training by chanchal mali nashik news)

वयाच्या आठव्या वर्षापासून योगासने सुरु केलेल्या माळी यांनी मल्लखांबपटू म्हणून राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळविली. योग अभ्यासात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. शिक्षणासोबतच योगा प्रशिक्षक म्हणून त्यांनी भोसला मिलिटरी स्कूलच्या रामदिंडींना, तसेच, मविप्रच्या होरायझन अकॅडमीत, केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनाही योगाचे धडे दिले.

इतकेच नव्हे, तर व्हीआयपी व महिंद्रासारख्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनाही योगाविषयी मार्गदर्शन केले. योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांच्या आयुष्यात होणाऱ्या सकारात्मक बदलांचे महत्व त्यांनी पटवून दिले आहे.

त्याचबरोबर स्वत:च्या आयुष्यातही बदल घडविला आहे. खेळाडू कोट्यातून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अर्थात्‌ पीएसआय पदासाठी परीक्षा दिली. या परीक्षेच्या मैदानी चाचणीत त्यांनी १०० पैकी १०० गुण मिळविले. परीक्षेचा अंतिम निकाल अद्याप बाकी असला, तरी त्यांचा आत्मविश्‍वास अधिक उंचावला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

योगा कुणासाठी?

* वय वर्षे ८ पूर्ण झालेल्यांनी योगासने करण्यास प्रारंभ करावा

* ४० वर्षावरील व्यक्तिंनी शारीरिक क्षमता ओळखून त्यानुसार नियमित सराव करावा

* हाडांची ठिसुळता लक्षात घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे

* योगासने करण्यासाठी कमाल वयोमर्यादा नाही

* जलद गतिने योगाकडे कल वाढत आहे.

"योगा हा फक्त एक दिवस करण्यासाठी नसून, त्याचा कायमस्वरुपी सराव केला पाहिजे. त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आपल्याला आयुष्यात खूप फायदा होतो. योगाच्या रुपाने एक ‘दाता’ तुम्हाला कायमस्वरुपी मिळतो. त्याच्याकडून काय घ्यायचे हे आपण ठरवावे. पण, योगामुळे आयुष्यात निश्‍चितपणे बदल होतो, हे मी आजपर्यंत अनेकांना सिद्ध करुन दाखविले आहे."-चंचल माळी, योगा प्रशिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT