Nashik Rain Alert : जिल्ह्यात शनिवारी (ता. १५) हलका ते मध्यम अथवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तवण्यात आली आहे.
तसेच पेरणीयोग्य पाऊस झालेल्या इगतपुरी, पेठ, दिंडोरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवण या पश्चिम घाट भागामध्ये मका, सूर्यफूल, बाजरी, भुईमूग, खुरासणी या खरीप पिकांची पेरणी शनिवारपर्यंत (ता. १५) पूर्ण करावी, असा सल्ला केंद्राच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे. (Light to moderate or thunder rain forecast in nashik news)
सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव, चांदवड, नाशिक व निफाड या भागांमध्ये खरीप पिकांची पेरणी सलग तीन ते चार दिवस पेरणीयोग्य ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर करावी, असेही शास्त्रज्ञांनी सुचवले आहे. मका, सूर्यफूल, बाजरी, भुईमूग, खुरासणी या पिकांच्या पेरणीस उशीर केल्यास त्याचा परिणाम उत्पादनावर होईल.
लष्करी अळीचे नियंत्रण वेळेत करावे लागेल, असे केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले. केंद्राच्या अंदाजानुसार १६ ते १९ जुलैला मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच तापमान कमाल २८ ते ३०, तर किमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा वेग तासाला २० ते २६ किलोमीटर राहील.
जलसाठा ३१ अन् पाऊस ६४ टक्के
जिल्ह्यातील सात मोठ्या आणि १७ मध्यम अशा २४ धरणांमध्ये ३१ टक्के साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात ७३ टक्के साठा उपलब्ध झाला होता. नाशिक शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या गंगापूर धरणात ३८, पालखेडमध्ये ३४, दारणामध्ये ५३, भावलीत ६०, मुकणेत ५०, नांदूरमध्यमेश्वरमध्ये ५९, चणकापूरमध्ये ४४, हरणबारीमध्ये ५४, केळझरमध्ये ४४, पुनंदमध्ये ४६ टक्के जलसाठा आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मालेगाव शहरासह खानदेशच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गिरणा धरणात आता १९ टक्के साठा उरला आहे. तसेच जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत ६४.५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी जुलैच्या मध्यापर्यंत जिल्ह्यात १६६.८ टक्के पाऊस झाला होता.
तालुकानिहाय आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी पुढीलप्रमाणे असून (कंसात गेल्या वर्षीच्या पावसाची टक्केवारी दर्शवते) : मालेगाव-८१.५ (२००.१), बागलाण-७४.७ (२१४.४), कळवण-९२.४ (२७४.६), नांदगाव- ५२.२ (१६१.४), सुरगाणा-८५.९ (२१६.६), नाशिक-५२.६ (१६५.६), दिंडोरी-१०९.५ (३३८.५), इगतपुरी-५७ (७१.३), पेठ-७५.६ (२४६.५), निफाड-७७.४ (२०७.९), सिन्नर-५१.४ (१४२.३), येवला-७८.५ (१२९.७), चांदवड-४८.३ (२३९.५), त्र्यंबकेश्वर-६२.५ (१४२.९), देवळा-७७.५ (२२६.५).
शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला
० पावसाचा अंदाज लक्षात घेता, भात रोपवाटिका, नवीन लावलेली फळबाग व भाजीपाला पिकातून अधिकचे काढावे पाणी
० पूर्वेकडील अवर्षणप्रवण व मैदानी विभागात पडणाऱ्या पावसाचे पाणी शेतात साठवण्यासाठी करावी उपाययोजना
० कापूस, तूर, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, सूर्यफूल या वेळेवर लागवड केलेल्या पिकात पावसाने उघडीप दिल्यास करावीत आंतरमशागत व तणनियंत्रणाची कामे
० पावसाचा अंदाज घेऊन पिकावर कीटकनाशकाची, बुरशीनाशकाची करावी फवारणी आणि भात रोपवाटिकेत रोपांच्या वाढीसाठी द्यावे नत्र खत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.