Actor Dilip Prabhawalkar esakal
नाशिक

Nashik News: ‘सावाना’ च्या 1 लाख 42 हजार पुस्तकांच्या सूची लिंकचे प्रभावळकरांच्या हस्ते लोकार्पण!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि वाचन संस्कृतीत १८२ वर्षे योगदान देणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाची एक लाख ४२ हजारांहून अधिक पुस्तकांची सूची एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. लिंकचे लोकार्पण अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते झाले. ही लिंक सभासदांच्या व्हाटसअपवर पाठवली जाणार आहे. तसेच पोथ्यांचे संगणकीकरण लवकर लोकसेवेत दाखल होत आहे.

वाचनालयाने काळानुरूप बदलत आधुनिक गोष्टी आत्मसात केल्या आणि आधुनिकीकरणाकडे पहिले पाऊल टाकले असे श्री. प्रभावळकर यांनी सांगितले. वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके म्हणाले, की लिंकमुळे वाचकांना पुस्तके निवडणे सोईस्कर होणार आहे. आवडणारी पुस्तके आणि आणखी पुस्तके पाहता येतील. पुस्तकांची उपलब्धता समजण्यासाठीचा हा पहिला टप्पा आहे. (link of 1 lakh 42 thousand books list of Sarvajanik vachnalay launched by Prabhalakar nashik news)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

सर्व पुस्तक त्यांचे विषय, लेखकांच्या नावानुसार शोधता येतील. केवळ काही शब्द टाकून ही सूची उपलब्ध होईल, असे आधुनिकीकरण केले असून पुढे पुस्तकांचे आरक्षण ही दुसऱ्या टप्प्यात करण्यात येईल, असे वाचनालयाचे उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव यांनी सांगितले. निवडलेली पुस्तके घरपोच देण्याची व्यवस्था तिसऱ्या टप्प्यात करण्यात येणार असून शुल्क आकारले जाईल, असे प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके यांनी सांगितले.

पोथ्यांच्या संगणकीकरणाची माहिती ग्रंथ सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी दिली. वाचनालयाच्या जुन्या देव-घेव विभागात झालेल्या कार्यक्रमासाठी वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, कार्याध्यक्ष गिरीश नातू, संजय करंजकर, प्रा. सोमनाथ मुठाळ, उदय मुंगी, प्रेरणा बेळे, सुरेश गायधनी, जयेश बर्वे, मंगेश मालपाठक, अॅड. अभिजित बागदे, वाचनालयाचे ग्रंथपाल दिलीप बोरसे, सहव्यवस्थापक योगिनी जोशी, ग्रंथ विभागातील संजय रत्नपारखी, सुनील पोळ उपस्थित होते.

माहितीसाठी संपर्क

० मोबाईल क्रमांक : ८६६८५२०१०७ / ८६०५६०३००२ / ८६६८५०२५६२

सभासदांना त्यावर मेसेज पाठवता येईल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT