liquor seized  esakal
नाशिक

Crime Update : कारचा पाठलाग करून मद्यसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गरवारे पॉइंट ते मुंबई नाका दरम्यान कारचा पाठलाग करून कारमधून सुमारे सव्वातीन लाखांचे विदेशी मद्य व मुद्देमाल हस्तगत केला. कारचालक फरार झाला असून, त्याच्या साथीदारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडले आहे.

संशयितांनी कारमध्ये चोरकप्पे करून त्यात विदेशी मद्यसाठा दडविला होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक एकने गुरुवारी (ता. ८) पहाटे ही कारवाई केली. (Liquor stock seized after car chase Nashik Crime Update Latest Marathi News)

पथकाला विदेशी मद्याची अवैधरीत्या वाहतूक होणार असल्याची खबर मिळाली होती.
त्यानुसार, एक्साईजच्या भरारी पथकाने गरवारे पॉइंट परिसरात सापळा रचला होता. गस्तीदरम्यान, त्यांना संशयास्पद कार (जीजे- ०५- सीआर- १७६३) दिसली. पथकाने कारचालकास थांबण्याचा इशारा केला असता, कार न थांबविता मुंबई नाक्याच्या दिशेने वेगात निघाला. पथकानेही कारचा पाठलाग सुरू केला.

संशयित कारचालकाचा मुंबई नाका सर्कलवर कारवरील ताबा सुटला व कार अपघातग्रस्त झाली. अपघातानंतर कारचालक कार सोडून पसार झाला. तेथे काही क्षणात पथकाचे वाहन आले व कारमधील एका संशयितास ताब्यात घेतले. अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली असता कारच्या बंपरजवळ चोरकप्पे बनवल्याचे व त्यात विदेशी मद्याच्या बाटल्या आढळल्या. अपघातामुळे बाटल्या फुटल्याने तेथे मद्य वाहत होते.

पथकाने क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन मुख्यालयात आणून तपासणी केली. त्या वेळी कारमध्ये सुमारे सव्वातीन लाख रुपयांचा मद्यसाठा, दोन बनावट वाहनक्रमांक प्लेट, एक मोबाईल आढळला आहे. याप्रकरणी पथकाने फिनेलकुमार अमृतभाई पटेल (रा. ता. पारडी, जि. वलसाड) यास ताब्यात घेतले आहे.

पथकाने मद्यसाठा, वाहन, मोबाईल असा सात लाख चार हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे निरीक्षक जे. एस. जाखेरे, दुय्यम निरीक्षक आर. सी. केरीपाळे, आर. व्ही. राऊळ, जवान धनराज पवार, राहुल पवार, सुनील दिघोळे, महेंद्र भोये, अनिता भांड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: कोल्हापूरमध्ये क्षीरसागर-पाटील समर्थकांत बाचाबाची

Sharad Pawar: हाय होल्टेज ड्रामा! मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या नेत्याला जबर मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Shrinivas Pawar: "भाऊ अन् मुलगा यांच्यामध्ये मी शरद पवारांच्या बाजूने..."; श्रीनिवास पवारांचं मत, दादांना धक्का बसणार?

विकासाचे मारेकरी कोण अन् वारकरी कोण? मतदानाच्या दिवशी सूचक ट्विट; 'भाईं'नी चेंडू जनतेकडे पाठवला, काय म्हणाले?

व्हा सज्ज! Lionel Messi १४ वर्षांनंतर पुन्हा भारतात येतोय, अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाचा दौरा

SCROLL FOR NEXT