state excise department esakal
नाशिक

Nashik Crime: अवघ्या 3 महिन्यांत सव्वा कोटींचा मद्यसाठा जप्त; 699 गुन्हे दाखल

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून सातत्याने अवैध मद्याची तस्करी केली जाते. तसेच, राज्यात प्रतिबंधित असतानाही परराज्यातून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्यसाठा शहरात आणला जातो.

परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा पथकांकडून गेल्या तीन महिन्यांमध्ये अवैध मद्याच्या तस्करीविरोधात धडक कारवाई करीत, सुमारे सव्वा कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. गत वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ४२ टक्क्यांनी अधिक आहे. (Liquor stock worth Rs 1 crore seized in just 3 months 699 cases filed Nashik Crime)

जिल्ह्याच्या सीमावर्ती परराज्यातून बेकायदेशीररित्या मद्याची वाहतूक नेहमीच होत असते. विशेषत: दादर-नगर-हवेली या केंद्रशासित राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेल्या देशी-विदेशी मद्याची वाहतूक नेहमीच नाशिक जिल्ह्यातून केली जाते.

राज्य उत्पादन शुल्क व जिल्हा-शहर पोलीसांकडून अनेकदा लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त केला जातो. तसेच, जिल्ह्यांतर्गत गावठी दारुचेही अड्डे असल्याने गावठी दारुचीही छुप्या मार्गाने वाहतूक व विक्री होते.

त्यावरही उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांकडून करडी नजर ठेवली जात असते. असे असतानाही, अवैध मद्याच्या वाहतुकीला आळा बसलेला नाही.

त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गेल्या तीन महिन्यांत केलेल्या कारवायांद्वारे १ कोटी ११ लाख १८ हजार ७११ रुपयांचा अवैध देशी-विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे.

जिल्हाभर करण्यात आलेल्या या कारवायांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ६९९ गुन्हे दाखल करीत ५०९ संशयितांना अटकही केली आहे. त्याचप्रमाणे, मद्याची वाहतूक करताना २१ वाहनेही जप्त करण्यात आलेली आहेत.

विशेषत: गत वर्षाच्या तीन महिन्यांच्या तुलनेमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेली कारवाई सर्वोत्तम ठरली आहे. गतवर्षी तीन महिन्यांत याच विभागाने ७८ लाख ४९ हजार ७५६ रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करीत ५५४ गुन्हे दाखल केले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हा व शहरासह सीमावर्ती भागात करडी नजर ठेवून पथकांमार्फत अवैध मद्यसाठ्याविरोधात धडक कारवाई केली जात आहे.

आकडेवारी सांगते...

वर्ष................ एकूण गुन्हे........जप्त मुद्देमाल..............जप्त वाहन.........अटक संशयित

एप्रिल- २३....... २०५..............१८,५३,५११/-.........२...................१४२

मे - २३ ...........२८१.............२०,५४,९६१/-.........६...................१९८

जून - २३..........२१३.............७२,१०,२३९/-.........१३.................१८९

एकूण .............६९९.............१,११,१८,७११/-.......२१.................५०९

----

एप्रिल - २२.......१८६.............२८,९९,३२५/-..........४...................९७

मे - २२...........१७९.............१४.२७.८१०/-..........१....................९१

जून-२२...........१८९.............३५,२२,६२१/-..........८....................११३

एकूण :...........५५४..............७८,४९,७५६/-.........१३...................३०१

"सीमावर्ती भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गस्ती पथके तैनात करण्यात आलेली आहे. नाकाबंदी वाढविण्यात आलेली आहे. त्यात आणखी वाढ केली जाईल."

-शशिकांत गर्जे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT