नाशिक

Nashik Crime : वाफोलीत दारूसाठा पकडला; साडेसतरा लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : मालवाहू बोलेरो-पीकअपच्या हौद्यात शहाळ्यांखाली चोरट्या पद्धतीने गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने आज कारवाई केली. (Liquor stock worth seventeen lakh was seized nashik crime news)

या कारवाईत १७ लाख ४९ हजार २२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चालक अंबादास पोपट आहिरे ऊर्फ आंबादासभाई पोपटभाई आहिरे (वय ४९, रा. दहिवड, ता. देवळा, जि. नाशिक) याला ताब्यात घेतले. ही कारवाई बांदा-वाफोली रस्त्यावर डोंगरीकर हॉटेलजवळ करण्यात आली.

गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने बोलेरो पीकअपमधून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार बांदा -वाफोली रस्त्यावर डोंगरीकर हॉटेल येथे सापळा रचण्यात आला. गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीला (एमएच ४८ सीबी ३२५९) तपासणीसाठी थांबविण्यात आले.

टेम्पोच्या पाठीमागील हौद्यात प्लॅस्टिकचे रिकामे कॅरेट व ७०० खराब नारळाची शहाळी ठेवण्यात आली होती. चालकाने संशयास्पद माहिती दिल्याने पथकाला संशय आला. त्यामुळे हौद्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी शहाळ्याखाली गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे खोके आढळले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पथकाने ८ लाख ६४ हजार रुपये किमतीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रँडचे १५० खोके, ३० हजार ७२० रुपये किमतीचे बिअरचे ८ खोके, ४ हजार ५०० रुपये किमतीची प्लास्टिक कॅरेट असा एकूण १७ लाख ४९ हजार २२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत चालकावर अटकेची कारवाई केली.

अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सुली तपासणी नाका निरीक्षक संजय मोहिते, कुडाळ निरीक्षक अमित पाडळकर, निरीक्षक, तानाजी पाटील, दुय्यम निरीक्षक प्रदीप रास्कर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, प्रसाद माळी, रणजित शिंदे यांनी कारवाई केली. निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: कोल्हापूरमध्ये क्षीरसागर-पाटील समर्थकांत बाचाबाची

Traffic Update: पुणे सातारा महामार्गावर अदभुतपुर्व वाहतुक कोंडी; 12 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

सायराशी लग्नानंतर ए आर रहमानच्या कुटुंबाने केलेली अ‍ॅडजस्टमेन्ट; पत्नीमध्ये आणि आईमध्ये सगळं आलबेल नव्हतं, गायकाने सांगितलेलं सत्य

Sharad Pawar: हाय होल्टेज ड्रामा! मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या नेत्याला जबर मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Shrinivas Pawar: "भाऊ अन् मुलगा यांच्यामध्ये मी शरद पवारांच्या बाजूने..."; श्रीनिवास पवारांचं मत, दादांना धक्का बसणार?

SCROLL FOR NEXT