Actor Hrithik Roshan and his co-stars during the screening of the song of the upcoming film Vikram Vedha at mumbai esakal
नाशिक

‘Vikram Vedha’ चा विक्रम; गाण्याचे 15 शहरांत थेट प्रक्षेपण

ब्रिजकुमार परिहार

नाशिक : हृतिक रोशन व सैफअली खान अभिनित ‘विक्रम वेधा’ या चित्रपटातील ‘अल्कोहोलिया...’ हे पहिलेवहिले गाणी प्रथमच राष्ट्रीय पातळीवरील इव्हेंटद्वारे रिलीज करण्यात आले. थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून देशभरातील १५ शहरांमध्ये हे गाणे प्रक्षेपित करण्यात आले. (Live broadcast of alcoholiya song from Vikram Vedha movie in 15 cities Nashik Latest Marathi News)

लखनौ, पाटणा, इंदूर, सुरत, नागपूर, जालंधर, चंदीगड, जोधपूर, नोएडा, नाशिक, वाराणसी, रांची, औरंगाबाद, मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये हे गाणे थेट प्रक्षेपणाद्वारे दाखविण्यात आले. या वेळी हृतिक रोशनने गाण्याच्या तालावर चाहत्यांसोबत ठेका धरत डान्स केला. या गाण्यात तो यापूर्वी कधीही न दिसलेल्या रूपात दिसला आहे.

काहीसं वेगळ्या शैलीत चित्रित केलेल्या या गाण्यात वेधा आणि त्याची टोळी उत्सव करताना दिसून आली. आपल्या करिअरमधील हा २५ वा चित्रपट असून, तो माइलस्टोन ठरेल, असा विश्‍वासही त्याने या वेळी व्यक्त केला. गणेश हेगडे आणि विशाल-शेखर यांनी हे गाणं बनविल्याचेही त्याने नमूद केले.

अभिनेत्री राधिका आपटे, रोहित सराफ यांनीही या वेळी संवाद साधला. दरम्यान, सप्टेंबरच्या सुरवातीलाच ‘विक्रम वेधा’चा ट्रेलर मोठ्या धूमधडाक्यात लाँच करण्यात आला. गुलशन कुमार, टी-सिरीज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिआ स्टुडिओ आणि वायनॉट स्टुडिओज प्रॉडक्शनतर्फे हा चित्रपट प्रस्तुत केला जाणार आहे. येत्या ३० सप्टेंबरला ‘विक्रम वेधा’ संपूर्ण जगभरात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT