Department of Tribal Development esakal
नाशिक

Nashik News : आदिवासींना व्यवसायासाठी मुदत कर्ज योजनेतून कर्जवाटप

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आदिवासी विकास विभागाअंतर्गत शबरी महामंडळ हे आदिवासींच्या उपजीविका वृद्धी करण्यासाठी विविध साहाय्य योजना राबवते.

यातील मुदत कर्ज योजनेतील लहान उद्योगधंद्यांसाठी देण्यात येणाऱ्या दोन लाख प्रतिलाभार्थी धनादेशाचे वाटप आदिवासी विकास वित्त महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड यांच्या हस्ते सोमवारी (ता.२४) करण्यात आले. (Loan disbursement to tribals through term loan scheme for business Nashik News)

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांचे अंतर्गत विशेष केंद्रीय साहाय्य योजनेंतर्गत उपजीविका आधारित विविध उपक्रम सुरू केले आहेत. महिला सशक्तीकरण योजना, मुदत कर्ज योजना स्वयंसहायता बचत गट योजना यांचा समावेश आहे.

याअंतर्गत आदिवासी बांधवांना त्यांच्या व्यवसाय स्वरूपानुसार कर्ज वाटप केले जाते. सदर वर्षी प्राप्त झालेल्या २०२ अर्जांपैकी ११६ लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात कर्जाचे वाटप करण्यात आले होते. सदर कर्जासाठी सहा टक्के इतका अल्प व्याजदर आकारण्यात येतो.

कर्ज प्राप्त झाल्यानंतर पुढील पाच वर्षात कर्जाची परतफेड लाभार्थ्याने करणे बंधनकारक आहे. पेठ तालुक्यातील कैलास छबिलदास चौधरी यांना प्रवासी वाहन घेण्यासाठी कर्जाच्या स्वरूपात ९ लाख १० हजार रकमेचा धनादेश सोमवारी त्यास सुपूर्द करण्यात आला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तसेच पेठ तालुक्यातील अक्षय काशिनाथ गवळी यांना किराणा दुकान व्यवसायासाठी दोन लाख रुपयांचा रकमेचा धनादेश देखील यावेळी प्रदान करण्यात आला.

"धनादेश मिळाल्यामुळे आनंद वाटला. यामुळे माझी आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लागेल. आता मी माझा स्वत:च्या दुकानात माल भरून व्यवसाय सुरु करणार आहे."

- अक्षय गवळी, पेठ

"आदिवासी बांधव स्वतः व्यवसाय करण्याचे स्वप्न बघत आहेत, ही मोठी बाब आहे. कर्जाच्या माध्यमातून त्यांना विभागाची मदत होणार आहे."

- लीना बनसोड, व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ मर्यादित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT