crop loan sakal
नाशिक

Nashik Crop Loan: जिल्हा बॅंकेकडून रब्बी हंगामासाठी अवघे अडीच कोटींचे कर्जवाटप

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crop Loan: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून यंदा रब्बी हंगामासाठी १६.३२ कोटी कर्जवाटपाचे लक्ष्यांक निश्चित करण्यात आले असून, यापैकी आतापर्यंत १५५ सभासदांना २.५६ कोटींचे (१३ टक्के) कर्जवाटप करण्यात आले आहे.

आर्थिक अडचणीत सापडलेल्या बॅंकेकडे निधी नसल्याकारणाने तसेच जिल्ह्यातील दुष्काळामुळे पीककर्ज वाटपाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे देवळा, इगतपुरी, नांदगाव, पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांत एकाही शेतकऱ्याने अद्यापपर्यंत पीककर्ज घेतलेले नाही. (Loan of only 2 and half crore given by Zilla Bank for Rabi season from nashik news)

जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामासाठी ६१५ कोटींचे कर्जवाटपाचे लक्ष्यांक निश्चित करण्यात आले आहे. यात खरीप हंगामासाठी ५९८.६८ कोटींचे उद्दिष्ट होते. यापैकी ४८ हजार ७२१ शेतकऱ्यांना ३० सप्टेंबर २०२३ अखेर ४५७.११ कोटींचे कर्जवाटप झाले. खरिपासाठी सरासरी ९८ टक्के कर्जवाटप झाले आहे. गेल्या वर्षी ५० हजार ६५० शेतकऱ्यांना ऑक्टोबर २०२२ अखेर ४४६.८२ कोटींचे कर्जवाटप झाले आहे. हे सरासरी ८१ टक्के होते.

यंदा रब्बी हंगामासाठी १६.३२ कोटींचे कर्जवाटप करण्याचे नियोजन करण्यात आले. रब्बी हंगामासाठी १ ऑक्‍टोबरपासून जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत १४९ शेतकऱ्यांना २.४७ कोटींचे पीककर्ज वाटप झाले आहे. तर, राष्ट्रीयीकृत बॅंकेमार्फत सहा शेतकऱ्यांना ९.४० लाख रुपयांचे कर्जवाटप झाले.

तालुकानिहाय विचार करता निफाड तालुक्यात सर्वाधिक ८० शेतकऱ्यांना १.३६ कोटींचे पीक कर्जवाटप झाले आहे. यापाठोपाठ दिंडोरी ७३.२८ लाख, नाशिक १९.६१ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले.

याशिवाय चांदवड ४.६९ लाख, कळवण तीन लाख, मालेगाव ६.०२ लाख, सटाणा १.९० लाख, सिन्नर ४४ हजार, येवला २.०९ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरण झाले. डिसेंबर संपत आललेला असताना जिल्ह्यात केवळ ५० टक्के पेरण्या झाल्या आहेत. पुढील महिनाभरात फार पेरण्या होण्याची शक्यता कमी आहे.

दुष्काळाचा फटका

यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. धरणात पाणीसाठाही कमी आहे, त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. येवला, सिन्नर, मालेगाव तालुके दुष्काळी जाहीर झालेले आहेत. निम्म्याहून अधिक तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत. कमी प्रमाणात पाणी असल्याने यंदा रब्बी पेरण्याही कमी झाल्या आहेत. परिणामी, पीककर्जही शेतकऱ्यांनी घेतले नसल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दुसऱ्या फेरी अखेर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT