local roads used during construction of Samruddhi Highway were destroyed  esakal
नाशिक

Samruddhi Highway Accident : समृद्धीच्या कामावेळी वापरलेल्या रस्त्यांची दुरवस्था; दुरूस्तीच्या आश्वासनाला बगल

अजित देसाई

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गाची उभारणी करताना वापरत आलेले स्थानिक रस्ते अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे उद्‌ध्वस्त झाले. हे रस्ते संबंधित ठेकेदारांकडून नूतनीकरण करून देण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) मार्फत सांगण्यात आले होते.

मात्र ठेकेदारांनी समृद्धीचे काम पूर्ण करून गाशा गुंडाळला असल्याने या रस्त्यांचे नूतनीकरण कधी होणार असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. ठेकेदार निघून गेल्यानंतर एमएसआरडीसी चे अधिकारी देखील रस्त्यांच्या दुरुस्ती संदर्भात दिलेल्या आश्वासनाला बगल देत आहेत. (local roads used during construction of Samruddhi Highway were destroyed nashik news)

नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यात समृद्धी महामार्गाचे बांधकाम करतेवेळी भरावासाठी वापरण्यात आलेले गौण खनिज तसेच इतर साहित्याच्या वाहतुकीसाठी स्थानिक रस्ते वापरण्यात आले. त्यात जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते तसेच गाव पातळीवरील वहिवाट रस्त्यांचा समावेश होता. या रस्त्यांवरून रात्रंदिवस ठेकेदार कंपनीच्या अवजड वाहनांची वाहतूक सुरू होती.

यामुळे डांबरीकरण उघडले जाऊन रस्ते खड्डेमय बनले. त्याचा त्रास गेल्या चार वर्षांपासून स्थानिकांना सहन करावा लागत आहे. अनेकदा या रस्त्यांची दुरुस्तीसाठी आंदोलनेही झाली आहेत. वर्षभरापूर्वी सिन्नर तालुक्यातील पॅकेज १२ व इगतपुरी तालुक्यातील पॅकेज १३ अंतर्गत समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले असून हा रस्ता शिर्डी ते भरवीर दरम्यान वाहतुकीसाठी खुला देखील करण्यात आला आहे. परंतु स्थानिकांच्या मागण्या जैसे थेच आहे. जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्यावरच काम मार्गी लागेल असे सांगतात.

रस्ते दुर्लक्षित झाल्याने शेतकरी त्रस्त

खंबाळे शिवारात खंबाळेहून मानोरी, दोडी, माळवाडी, भोकणी, खोपडी कडे जाणारे रस्ते दुर्लक्षित राहिले. या रस्त्यांवरून भाजीपाला वाहतूक करणारे शेतकरी त्रस्त झाले आहेत. रेकॉर्डवर असणारे गाडीवाट रस्ते बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

खंबाळे-सुरेगाव रस्त्याचे निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याच्या तोंडावर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून अस्तरीकरण करण्यात आले. दातली परिसरातील तीन पैकी केवळ एका रस्त्याची तीदेखील अर्धवट दुरुस्ती करण्यात आली. माळवाडीकडे जाणारा अर्ध्या अंतराचा रस्ता खड्डेमय बनला आहे.

अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ

दुरुस्त केलेल्या आणि न केलेल्या रस्त्यांची माहिती द्यायला एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार कोळी यांच्याकडे विचारणा केली असता कनिष्ठ अधिकाऱ्याला सांगून माहिती उपलब्ध करून देतो असे त्यांनी सांगितले. रस्त्यांची दुरुस्तीची कामे करून दिली असे अधिकारी केवळ तोंडी सांगतात. मात्र लिखित स्वरूपात कोणत्या रस्त्याचे किती काम केले ही माहिती द्यायला टाळले जाते.

रस्त्याची अर्धवट कामे

वावी ते घोटेवाडी, वावी ते कहांडळवाडी, पाथरे ते पोहेगाव, गोंदे ते दापूर-चापडगाव, पांगरी ते मऱ्हळ, दातली ते माळवाडी, मलढोण फाटा ते मलढोण या रस्त्यांची दुरुस्ती करून देण्यात आल्याचे एमएसआरडीसीचे अधिकारी निंबादास बोरसे यांनी सांगितले.

मात्र यापैकी वावी ते घोटेवाडी, वावी ते कहांडळवाडी रस्ता अर्धवट बनवण्यात आला. समृद्धीपासून कहांडळवाडी गावापर्यंतचा रस्ता आमदार कोकाटे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधीतून मार्गी लागला. पाथरे ते पोहेगाव हा रस्ता देखील अर्धवट आहे.

"पाथरे शिवारात पाथरे ते जवळके, शहा मीरगाव, बहादरपूर, पोहेगाव, कोळगाव माळ या रस्त्यांपैकी पोहेगाव रस्त्याचे अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतराचे मजबुतीकरण करण्यात आले. उर्वरित रस्त्यांचे खड्डे देखील बुजवले नाहीत. आमदार माणिकराव कोकाटे यांनीच याबाबतचा पाठपुरावा करावा" - मच्छिंद्र चिने, माजी सरपंच पाथरे

"डुबेरे, सोनारी, सोनांबे शिवडेपासून भरवीरपर्यंत स्थानिक रस्त्यांची सारखीच परिस्थिती आहे. या रस्त्यांवरून वाहतूक करताना संबंधित कंपन्यांनी कुठलीही दुरुस्ती केली नाही. अनेक नाल्यांचे प्रवाह अडवले गेल्याने पावसाळ्यात शेतीचे नुकसान होते. यंदाही हीच परिस्थिती उद्भवणार आहे. आगासखींड-बेलूपासून पाथरेपर्यंत आंदोलन उभे करावे लागेल." - डॉ. रवीद्र पवार, सभापती, सिन्नर बाजार समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर 10 लाखांचे बक्षिस; कोण आहे अनमोल बिश्नोई?

Diwali 2024: दिवाळीत घराची स्वच्छता करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, काम होईल सोपे

Nagpur East Assembly Election : भाजपच्या ‘कृष्णा’ला अजित पवार गटाच्या आभा यांचे आव्हान, आभा पांडेंकडून अर्ज दाखल

NCP Jalgaon Vidhansabha 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देवकर, खोडपे, खडसेंना उमेदवारी!

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT