Devidas Gurghe, Pradeep Davange, Deepak Ugle etc. while giving a statement to Deputy Collector Jirwal demanding full time Group Development Officer to Yevla Panchayat Samiti. esakal
नाशिक

Nashik News: येवला BDO कार्यालयात लॉकडाऊन! कामे होत नसल्याने कायमस्वरूपी गटविकास अधिकाऱ्यांसाठी CEOना साकडे

सकाळ वृत्तसेवा

येवला : येथील पंचायत समितीचा कारभार प्रभारीच्या खांद्यावर असून, कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्याने ग्रामीण भागातील विकासाला खीळ बसली आहे.

त्यामुळे पूर्णवेळ गटविकास अधिकारी मिळण्यासाठी उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ, नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना साकडे घातले आहेत. (Lockdown in Yeola BDO office CEO left for Group Development Officers on permanent basis due to lack of work Nashik News)

नाशिक येथे सोमवारी (ता. ८) वारकरी मंचचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख देविदास गुडघे, मराठा मावळा संघटना उत्तर महाराष्ट्रप्रमुख प्रदीप दवंगे, दीपक उगले यांनी निवेदन दिले. येथील पंचायत समितीचा विशेष शासकीय कारभार गटविकास अधिकारी यांच्या खांद्यावर असतो.

पंचायत समितीत गटविकास अधिकारी रुजू होताच काही दिवसांतच बदली होते, असे मागील सहा ते सात महिन्यांपासून सुरू आहे. परिणामी येथील गटविकास अधिकारीऱ्याचे कार्यालय वारंवार लॉकडाऊन असल्याचे दिसते.

त्यामुळे विविध कामांसाठी येणाऱ्या लाभार्थ्यांचे हेलपाटे व्यर्थ जात आहेत. समुदाय विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी गटविकास अधिकारी खूप महत्त्वाचे प्रशासकीय पद आहे. मात्र, जिल्हा परिषदेने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

एकाच व्यक्तीकडे दोन ते तीन पंचायत समितीचा कारभार सोपविला आहे. तरीही आवश्यक असलेल्या अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरली जात नाहीत. ही गोरगरीब जनतेसाठी शोकांतिका म्हणावी लागेल.

पंचायत समितीची ‘एक ना धड भाराभर चिंध्या’, अशी अवस्था समितीच्या कारभाराची झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांसह, गोरगरीब लाभार्थी प्रशासनाप्रती संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

त्यामुळे कायमस्वरूपी गटविकास अधिकारी देण्यात यावा, तसेच तालुक्यात यावर्षी भिषण दुष्काळजन्य परिस्थीती आहे.त्यामूळे जॉब कार्ड धारक लाभार्थ्यांना काम व मजुरांना रोजंदारी मिळत नसल्याने त्यांना दिवस वाढवून देण्यात यावे व दुष्काळी परिस्थितीत मजुरांच्या हाताला काम मिळावे.

यासाठी देखिल तरतूद करण्यात यावी. ग्राम रोजगार सेवकांना मानधन ही मिळेना अन मजुरांना काम मिळेना अशी परिस्थिती कायमस्वरूपी राहिली तर ग्राम रोजगार सेवक यांनी संसार व मुला मुलींचे शिक्षण कसे करायचे असा सवाल करून सर्व पोरखेळ थांबवून तातडीने कायमस्वरूपीचे गट विकास अधिकारी यांची नेमणूक करून मजुरांना द्यावे अशी मागणी निवेदनात केली आहे

"मागील सहा ते सात महिन्यांपासून पंचायत समितीला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळत नसल्यामुळे सर्वसामान्यांचे कामेही होत नाही. ऐन दुष्कळात कामांत व्यत्यय येत आहे. ‘रोहयो’ची कामे होत नसून मजुरांना कामे मिळेनासे झाले आहेत. ग्रामीण भागातील विकासासाठी तातडीने गटविकास अधिकारी नेमावा.

-देविदास गुडघे, वारकरी मंच, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT