नाशिक : राज्य शासनाच्या निकषांनुसार आता नाशिक ‘रेड झोन’मध्ये (nashik out of red zone) नसल्यामुळे जिल्ह्यात निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार मंगळवार (ता. १)पासून अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, हॉटेल, मिठाई विक्री, शाळा, लॉन्स, चित्रपटगृहांना यातून वगळण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात वीकेंड लॉकडाउन मात्र पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. (lockdown-Restrictions-relaxed-in-Nashik-from-today)
१५ जूनच्या सकाळी सातपर्यंत निर्बंध शिथिल
‘ब्रेक दी चेन’अंतर्गत आता १५ जूनपर्यंत पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून १५ जूनच्या सकाळी सातपर्यंत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.३१) जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात, हा निर्णय घेण्यात आला.
नाशिक ‘रेड झोन’बाहेर
पॉझिटिव्हिटी व्हीटीदर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या निकषांनुसार नाशिक जिल्हा आता ‘रेड झोन’च्या बाहेर आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात येणार असून, आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने आता दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवता येतील. दुपारी तीननंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्या-जाण्यावरही निर्बंध असतील. कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालयेही २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल, तर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल. कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवशी दुपारी दोनपर्यंत सुरू राहू शकतील. मात्र, पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी दुकानांच्या वेळा वाढविता येणार आहेत. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पांडे आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अत्यावश्यक सेवेबाबत
* सरसकट सगळी दुकाने सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत खुली राहणार
* भाजी मार्केट बंद, पण सध्या नेमून दिलेल्या जागेवार विक्री होईल
* दूध विक्री सद्यःस्थितीत आहे तशीच सुरू राहील
* स्वस्त धान्य दुकान, शिवभोजन थाळीचे पार्सलद्वारे वितरण सुरू
* अंत्यविधीसाठी कमाल २०, तर त्यानंतरच्या विधीसाठी १५ जणांची उपस्थिती
* वीकेंड लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवेसाठीच परवानगी
---
अन्य सेवांबाबत (सकाळी सात ते दुपारी दोन)
* बस, रिक्षा, टॅक्सी, चारचाकी वाहनांना परवानगी
* बँका, पतसंस्था सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत सुरू
* बांधकाम क्षेत्राची ठिकाणे (साइटवरील कामकाज)
* शैक्षणिक साहित्य, वह्या-पुस्तके व स्टेशनरीची दुकानं
* हार्डवेअर, गॅरेज, घर दुरुस्ती, इलेक्ट्रिक दुकानं
* ई-कॉमर्स वस्तूंची विक्री सुरू राहील
* मुद्रांक दस्त नोंदणीचे कामकाज सुरू राहील
---
या बाबींना प्रतिबंध
* दारू दुकान, हॉटेल, ढाबे, मिठाई दुकाने
* दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत फिरण्यास
* विवाह, स्वागत समारंभ, लॉन्स
* चित्रपटगृह, तरण तलाव, नाट्यगृह, सभागृह
* क्रीडांगण, पार्क, उद्यान, मोकळ्या जागा
* शाळा, महाविद्यालय, खासगी क्लास
* रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत नाइट कर्फ्यू
---
पार्सल सुविधासाठी
* हॉटेल, फूड स्टॉल, मिठाई, बेकरी सकाळी सात ते सायंकाळी सात पार्सल सुरू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.