water cut esakal
नाशिक

Nashik Water Cut: पाणीकपातीला लोकसभा निवडणुकीचा अडसर; प्रशासनाची कोंडी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Cut: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात महापालिकेसाठी आरक्षित ठेवल्या जाणाऱ्या पाण्यात जवळपास ७८६ दशलक्ष घनफुटीने कपात होणार असल्याने त्याचा परिणाम शहरात पाणी जपून वापरावे लागणार आहे.

त्यासाठी पंधरा टक्के पाणीकपात करण्याचे नियोजन प्रशासनाने केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा रोष नको म्हणून राजकीय दबाव वाढण्यास सुरवात झाल्याने प्रशासनाची ‘इकडे आड, तिकडे विहीर’, अशी अवस्था होत आहे.

त्यामुळे वेळेवर म्हणजे उन्हाळ्यात कपात करण्याऐवजी आत्तापासूनच कपातीचे धोरण अवलंबिताना दर दोन महिन्यांनी आढावा घेऊन पुढील नियोजन ठरविले जाणार आहे. (Lok Sabha elections due to water shortage nashik news)

मराठवाड्यात अपुरा पाऊस पडल्याने मराठवाड्याला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरण क्षमतेपेक्षा कमी भरले. जवळपास ४५ टक्के धरण भरल्याने गोदावरी पाटबंधारे विभागाने नाशिक व नगरच्या धरणांमधून ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे निर्देश दिले. गंगापूर धरण समूहातून ०.५ टीएमसी, तर दारणा धरण समूहातून २.६ टीएमसी पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. जलसंपदा विभागाकडून गंगापूर धरणात उपलब्ध असलेल्या पाण्यातून शहरासाठी नियोजन केले जाणार आहे.

सद्यःस्थितीत १५ ऑक्टोबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीसाठी गंगापूर धरण समूहातून चार हजार ४००, दारणा धरणातून १००, तर मुकणे धरणातून एक हजार ६००, असे एकूण सहा हजार १०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे नोंदविली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाकडे केलेल्या पत्रव्यवहारानुसार जलसंपदा विभागाने महापालिकेसाठी गंगापूर धरण समूहातून तीन हजार ८०७, दारणा धरणातून १००, तर मुकणे धरणातून एक हजार ४०७, असे एकूण पाच हजार ३१४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित केले जाणार आहेत. त्यामुळे नाशिक शहराला करावयाच्या पाणी आरक्षणात तब्बल ७८६ दशलक्ष घनफूट पाण्याची कपात होणार आहे.

सध्या नाशिक शहराला दररोज ५४० ते ५६० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे उपलब्ध पाणी जपून वापरण्यासाठी पंधरा टक्के कपात अटळ राहणार आहे. परंतु कपात करताना प्रशासनाची कोंडी राजकीय पक्षांकडून होणार आहे.

जून २०२४ अखेरपर्यंत पाणी पुरविण्यासाठी ऐनउन्हाळ्यात पाणीकपात करण्याचे नियोजन होते. परंतु लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होईल.

त्यामुळे राजकीय पक्षांकडून प्रशासनावर आत्तापासूनच दबाव असल्याने लवकरच पाणीकपात लागू करण्याचे सूतोवाच करण्यात आले आहेत. हिवाळ्यात कपात केल्यास पाणीपुरवठा कमी लागेल. तसेच नागरिकांची मानसिकतादेखील तयार होणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

जुने नाशिक, सिडकोचा विचार

पाणीकपात लागू करताना जुने नाशिक व सिडको संदर्भात वेगळा विचाराचे नियोजन आहे. दोन्ही विभागांमध्ये कुटुंबीयांची साठवण क्षमता नाही. त्यामुळे गरज भासल्यास टँकरने देखील पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.

"पाणीकपातीचा अद्यापपर्यंत निर्णय घेण्यात आला नाही; परंतु उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता पाणीकपात करणे अटळदेखील आहे, तरच उन्हाळ्याच्या शेवटपर्यंत पाणी पुरेल." - डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका

महापालिकेची मागणी व प्रत्यक्ष मिळणारे पाणी आरक्षण (‘दलघफू’मध्ये)

धरण मागणी प्रत्यक्षात आरक्षण

गंगापूर धरण समूह ४,४०० ३,८०७

मुकणे १,६०० १,४००

दारणा १०० १००

एकूण ६,१०० ५,३१४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT