BJP esakal
नाशिक

Loksabha Election : ‘भाजप’ च्या ‘सानप-आहेर’ लॉजिक ने कार्यकर्ते संभ्रमात

सकाळ वृत्तसेवा

Loksabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिंडोरी मतदार संघासाठी माजी आमदार बाळासाहेब सानप तर नाशिक लोकसभा मतदार संघासाठी जिल्हाप्रमुख केदा आहेर यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर सानप व आहेर या लॉजिकमुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले आहे. (loksabha electionBJP Sanap Aher logic confuses activists nashik news)

आहेरांचा नाशिक लोकसभा मतदारसंघाशी तर सानप यांचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाशी काडीमात्र संबंध नसताना दोघांच्या नियुक्तीने पक्षाच्या श्रेष्ठींना नेमके काय सिद्ध करायचे असा सवाल कार्यकर्ते उपस्थित करत आहे.

भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटासोबत युती असली तरी भाजपच्या वतीने मागील आठवड्यात दोन महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या दोन्ही घोषणा महत्त्वाच्या मानल्या जात आहे.

लोकसभेच्या ४५ तर विधानसभेच्या २०० हून अधिक जागा निवडून येण्याचे उद्दिष्ट पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहे याचा अर्थ शिंदे गटाला भारतीय जनता पक्षाकडून फक्त तीन जागा लोकसभेच्या मिळतील, असा काढला जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुसरीकडे विधानसभेच्या २८६ जागांपैकी २०० जागा भारतीय जनता पक्ष लढविणार असल्याने शिवसेनेच्या शिंदे किंवा भाजप सोबत असलेल्या अन्य छोट्या पक्षांना ८६ जागांवर समाधान मानावे लागेल, असा अर्थ काढला जात आहे. भाजपने ४५ लोकसभा मतदारसंघासाठी जबाबदारी निश्चित केली.

या जबाबदारी निश्चितीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्याकडे दिली तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे दिली. या दोघांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्ते व पदाधिकारी मात्र संभ्रमात सापडले आहे.

सानप आहेरांचा लागणार कस

मूळचे देवळा येथील केदा आहेर यांचा लोकसभा मतदारसंघ दिंडोरी आहे, असे असताना त्यांच्याकडे नाशिक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली. बाळासाहेब सानप यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द नाशिक महानगरपालिकेपूर्ती मर्यादित राहिली. त्यातही पंचवटी हेच त्यांचे कार्यक्षेत्र.

असे असताना त्यांच्याकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली. सानप व आहेर या दोघांचाही त्यांना जबाबदारी दिलेल्या मतदार संघाशी संबंध नाही, त्यामुळे ते कितपत मतदारसंघापर्यंत पोहोचतील व दोन्ही मतदारसंघांमधील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मतदार कुठपर्यंत त्यांना स्वीकारतील, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : 'ED प्रकरणात कोर्टानं मला क्लीन चिट दिलीये, शरद पवारांना याची माहिती नाही'; काय म्हणाले मुश्रीफ?

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

'PM मोदी उठता-बसता बाळासाहेबांचं नाव घेतात आणि उद्धव ठाकरेंच्याच पाठीत खंजीर खुपसतात'; प्रियांका गांधींचा हल्ला

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Panchang 17 November: आजच्या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

SCROLL FOR NEXT