Long drought relief no crop insurance 52 thousand farmers waiting for arrival  esakal
नाशिक

Nashik Agricultural News: दुष्काळी मदत लांब, पीकविमाही मिळेना! येवल्यात 52 हजारांवर शेतकऱ्यांना प्रतीक्षा

तालुक्यात सुमारे २६ हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत विम्याचा लाभ झाला असून, सुमारे ५२ हजार शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षाच आहे.

संतोष विंचू

येवला : कधी नव्हे, इतके प्रचंड नुकसान झाल्याने यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी आर्थिक संकटाचे ठरले. ‘खरिपा’तील पिके हाती न आल्याने शासनाने तालुक्यात दुष्काळ जाहीर केला.

मात्र, दुष्काळी भागाला मिळणारी कुठलीही मदत अद्याप हातात पडलेली नाही. हक्काचा पीकविमाही मिळत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त होत आहे.

तालुक्यात सुमारे २६ हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत विम्याचा लाभ झाला असून, सुमारे ५२ हजार शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षाच आहे. (Long drought relief no crop insurance 52 thousand farmers waiting for arrival Nashik News)

प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा हप्ता फक्त एक रुपया असल्याने व कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याने यंदा विक्रमी संख्येने पीकविमा काढला.

पेरणीपासून ते काढणीपर्यंत हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, तसेच पावसातील खंड यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका ही तृण व कडधान्य, तसेच भुईमूग, कारळा, सोयाबीन ही गळीत धान्य पिके आणि कापूस, खरीप कांदा ही नगदी पिके नुकसानासाठी पीकविम्यात समावेश आहे.

मका पिकाला हेक्टरी ३५ हजार ५९८, कापसाला ५० हजार, सोयबीनला ५० हजार, बाजरीला २७ हजार ५००, तुरीला ३६,८००, तर मुगाला २२,५०० रुपयेप्रति हेक्टरी विम्याचे संरक्षण मिळाले आहे.

तालुक्यातील सर्वच मंडलात २५ दिवसांपर्यंत पावसाचा खंड पडला आहे. त्याचा खरीप पिकांना मोठा फटका बसला. बहुतांशी शेतकऱ्यांना उत्पादनात शंभर टक्के नुकसान झाले असून, सरासरी विचार केला, तरी हंगामातील उत्पादन जवळपास ७० ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त घटले आहे.

पीकविम्याच्या तरतुदीनुसार खरीप हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे पूर, पावसातील खंड व दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पनात घट होणार असेल, तर नुकसानभरपाईच्या प्रमाणात २५ टक्क्यांपर्यंत नुकसानभरपाई आगाऊ देण्याची तरतूद आहे.

त्या तरतुदीनुसार कृषिमंत्र्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी घोषणा केल्यानंतर ही अनेक दिवस उलटूनही शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळालेली नाही.

सुमारे २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. तालुक्यात या वर्षी ७८ हजार ९६६ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला आहे.

यापैकी १३ हजार ६६९ मका उत्पादकांना तीन कोटी २८ लाख ७२ हजार रुपये, १ हजार २९७ बाजरी उत्पादकांना १९ लाख ५५ हजार, तर ११ हजार ३३४ सोयाबीन उत्पादकांना चार कोटी ४० लाख ७० हजार रुपयांची अग्रीम रक्कम अदा केली आहे.

आतापर्यंत २६ हजार ३०० शेतकऱ्यांना सुमारे सात कोटी ८८ लाख ९७ हजार रुपये वर्ग झाले आहेत. ही रक्कम मिळाली असली, तरी तब्बल ५२ हजारांवर शेतकऱ्यांना अजून विम्याची प्रतीक्षाच आहे.

हा दुजाभाव कसा केला, असा सवाल व्यक्त होत आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार पाटोदा, अंदरसूल, राजापूर, अंगणगाव, येवला या महसूल मंडलातील शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहे, तर जळगाव नेऊर, सावरगाव, नगरसूल इतर भागांतील शेतकरी मदतीपासून वंचित असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

दुष्काळ जाहीर झाला, पण दुष्काळी मदतीचा कुठलाच लाभ अद्याप मिळाला नसून आर्थिक मदतही शासनाने दिलेली नाही. त्यामुळे किमान विम्याची रक्कम वेळेत देऊन आर्थिक आधार द्यावा, अशीही मागणी शेतकरी करीत आहेत.

‘रब्बी’त फक्त १४ हजार शेतकऱ्यांचा विमा

खरीपपात मोठ्या प्रमाणात विमा उतरवल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.मात्र पाऊसच नसल्याने रब्बीच्या पिकात मोठी घट झाली आहे.

परिणामी पीक विमा योजनेत सहभागी होणारी शेतकऱ्यांची संख्या ही घटली आहे.आतापर्यंत केवळ १४ हजार ३८९ शेतकऱ्यांनीच रब्बीच्या पिकाचा विमा उतरवला आहे.

"नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा कवच उपयोगी पडतो. शेतकरी हिस्साही शासनाने भरल्याने यंदा अवघ्या एक रुपयात प्रमुख पिकांचा विमा काढला. तालुक्यात अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन जनजागृती केल्याने तब्बल ७९ हजार शेतकऱ्यांनी विमा उतरविला. शासन निकषानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर आग्रीम रक्कमही जमा होत असून, आतापर्यंत सुमारे सात कोटी ८८ लाख रुपये जमा झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचा विमा रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होईल."-शुभम बेरड, तालुका कृषी अधिकारी, येवला

"मागील वर्षी सप्टेंबरमध्येच पिकांचे पूर्णतः नुकसान झाले. अद्याप पीकविमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यातही शासनाने दुजाभाव करीत काही ठिकाणी विम्याचा लाभ दिला, तर काही ठिकाणी अद्याप शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. हा प्रकार चुकीचा असून, सर्व शेतकऱ्यांना त्वरित रक्कम वर्ग करून दुष्काळी अनुदानाचा लाभ द्यावा."

-मच्छिंद्र जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT