किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा
Nashik Rain News : जिल्ह्यातील महत्त्वाची धरणे काठोकाठ भरलेली दिसत असली, तरी गेल्या पाच वर्षांत यंदा सर्वांत कमी पावसाची नोंद झाली आहे. जून ते सप्टेंबर (ता. २५)पर्यंत अवघे ६७ टक्के पाऊस झाला. हवामान विभागाकडे प्राप्त आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.
पावसाळ्याचे दिवस कमी होत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत दिसून आले आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत ऑगस्ट तर पूर्णत: कोरडा गेला. जून व जुलैमधील पावसाच्या भरवशावर पेरणी केलेली पिके काही जमिनीतच राहिली असून, काहींनी महिनाभरात मान टाकली. (lowest rainfall this year in 5 years nashik news)
पावसाळ्याचे चार महिने संपत आले तरी जिल्ह्यावरील दुष्काळाचे सावट अद्याप मिटलेले नाही. जिल्ह्यात मोठी सात, तर मध्यम स्वरूपाची १७ धरणे आहेत. यात सरासरी ८३ टक्के जलसाठा आहे; पण नागासाक्या, गिरणा व माणिकपुंज ही धरणे कोरडीच आहेत. जिल्ह्यातील १४ धरणांमधून सध्या विसर्ग सुरू आहे.
त्यातही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. उर्वरित धरणांत पुरेसा साठा असला, तरी पाहिजे त्या प्रमाणात विसर्ग न झाल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणात पाणी सोडावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. गेल्या सहा वर्षांत दुसऱ्यांदा अशी परिस्थिती ओढवली आहे. यापूर्वी २०१८ मध्ये सरासरी ५९ टक्के पाऊस झाला होता.
कुठले धरण किती टक्के भरले
गंगापूर- ९७, कश्यपी- ९२, गौतमी गोदावरी- ९४, आळंदी- १००, पालखेड- ९८, करंजवण- १००, वाघाड- १००, ओझरखेड- ९४, पुणेगाव- ९८, तिसगाव- ५३, दारणा- १००, भावली- १००, मुकणे- ९०, वालदेवी- १००, कडवा- ९८, नांदूरमध्यमेश्वर- १००, भोजापूर- ९४, चणकापूर- ९६, हरणबारी- १००, केळझर- १००, नागासाक्या- ०, गिरणा- ५४, पुनद- ९७, माणिकपुंज- ९.
मागील सहा वर्षांत झालेला पाऊस
२०१७ : १२७ टक्के
२०१८ : ५९ टक्के
२०१९ : १०९ टक्के
२०२० : ९४ टक्के
२०२१ : ९६ टक्के
२०२२ : १३४ टक्के
२०२३ : ६५ टक्के (२५ सप्टेंबरपर्यंत)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.