मालेगाव (जि. नाशिक) : रमजाननिमित्त शहरातील मुस्लीम बहूल असलेल्या पूर्व भागात २० पेक्षा अधिक ठिकाणी विशेष बाजार भरत आहेत. या बाजारांमध्ये फळे, खाद्यपदार्थ, भाजीपाला मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. इतर ठिकाणांपेक्षा विशेष बाजारात मिळणाऱ्या वस्तु दहा ते वीस टक्क्यांनी स्वस्त आहेत.
त्यामुळे सामान्य व गरीब ग्राहकांना या बाजारांनी भुरळ पडली आहे. दरम्यान या बाजारांमधून दिवसाकाठी लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. (lure of specialty markets to general public Daily turnover of lakhs in Malegaon during Ramzan Festival nashik news)
रमजाननिमित्त येथे पहिल्या रोजापासून विशेष बाजारांना सुरवात झाली. सरदार चौक, किदवाई रोड, भिक्कु चौक, पेरी चौक, नवीन बसस्थानक, कुसुंबा रोड, मच्छी बाजार, सकावत हॉटेल, रमजानपुरा, आयशानगर, आझादनगर, पिवळापंप, चंदनपुरी गेट आदी भागात विशेष बाजार भरतात.
या बाजारात खजूर, टरबूज, खरबूज, पपई, चिकू, द्राक्ष, केळी आदी फळांची रेलचेल आहे. भजी, समोसे, कचोरी, मिठाई, नान (मोठा पाव) तसेच भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर दुकाने आहेत.
या बाजारांमध्ये खरेदी-विक्री अधिक होते. त्यामुळे व्यावसायिक इतर ठिकाणांच्या तुलनेने कमी भावात वस्तू देतात. परिणामी सामान्य व गरीब कुटुंबीयांचा ओढा या बाजाराकडेच वाढला असल्याचे चित्र सध्या मालेगावात दिसत आहे.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
विशेष बाजारांमध्ये दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत सर्वाधिक गर्दी असते. रोजा सोडण्यासाठी नागरिक फळे व वस्तू खरेदीसाठी सायंकाळी विशेष बाजारांमध्ये गर्दी करतात. पहाटे रोजा सुरु होण्यापूर्वी मुस्लीम बांधव जेवण, दूध घेतात. त्यामुळे रात्री आठ ते दहा या वेळेत देखील खरेदीसाठी गर्दी असते. पूर्व भागात रमजान पर्वात दुधाची देखील मोठ्या प्रमाणावर विक्री होते.
रमजान पर्वाने शहरातील दिनचर्या बदलली आहे. सायंकाळपासून सुरु होणारे हॉटेल, उपाहारगृह मध्यरात्री उशिरापर्यंत गजबजलेली असतात. रमजानचे जवळपास निम्मे रोजे संपत आले आहेत. त्यामुळे ईदच्या खरेदीला सुरवात झाली असून बाजारपेठांमध्येही रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.