NMC News : ७० मीटर उंचीवरील इमारतींवरील आग विझविण्यासाठी हायड्रोलिक शिडीचा प्रवास दिवाळखोरीत थांबला असला तरी प्रदूषणमुक्ती व स्वच्छ शहर स्पर्धेला चालना देण्यासाठी महापालिकेमार्फत खरेदी करण्यात आलेले चार यांत्रिकी झाडू सप्टेंबरअखेर महापालिकेच्या ताफ्यात दाखल होत आहे.
यंत्रामुळे प्रतिदिन १६० किलोमीटरचे रस्ते झाडले जाणार आहेत. (Machines will sweep 160 kilometers of roads per day In NMC fleet at end of September nashik)
‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम’ अंतर्गत नाशिक महापालिकेला जवळपास ४१ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून प्राप्त झाला आहे.
निधीतून हवा गुणवत्ता नियंत्रणाबरोबरच रोजचे निरीक्षण नोंदविण्यासाठी केंद्र उभारणे, विद्युतदाहिनी बसविणे, बांधकाम डेब्रिज विल्हेवाट प्रकल्प, दुभाजकांमध्ये शोष वनस्पती, एकीकृत सिग्नल प्रणाली,
सुलभ शौचालयांवर सोलर रुफ टॉप बसविणे आदी कामे करणे अपेक्षित असताना यांत्रिकी विभागाकडून रस्ते झाडण्यासाठी यांत्रिकी झाडू (रोड स्वीपर) खरेदी करण्याचा आग्रह करण्यात आला.
त्यानुसार २० ऑगस्ट २०२१ ला सहा विभागात यांत्रिक झाडू खरेदीचा निर्णय घेण्यात आला. पाच वर्षासाठी देखभाल- दुरुस्तीसह ३३ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महासभेवर मंजूर करण्यात आला.
एप्रिल २०२३ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले. ऑक्टोबरमध्ये यांत्रिकी झाडू पुरविण्याची मुदत संपुष्टात येत आहे. त्याअनुषंगाने सप्टेंबरअखेर यांत्रिकी झाडू महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पाच वर्षासाठी २१ कोटींचा खर्च
शहरात २१५० किमी लांबीचे रस्ते आहे. एका यांत्रिकी झाडूसाठी दोन कोटी सहा लाख रुपये, असे एकूण बारा कोटी ३६ लाख रुपये खर्च होणार आहे.
पुढील पाच वर्षाच्या कालावधीत ऑपरेशन, देखभाल- दुरुस्ती, इंधन, मनुष्यबळ पुरविण्यासाठी दरमहा पाच लाख ८५ हजार ७०० रुपये खर्च होणार आहे. पाच वर्षासाठी २१ कोटी ८ लाख रुपये खर्च होईल.
साडेतीन मीटर रुंद रस्त्यावर एका यांत्रिकी झाडूमार्फत ४० किलोमीटरप्रमाणे प्रतिदिन १६० किलोमीटर रस्त्याची सफाई केली जाणार आहे. गोळा केलेला कचरा वहन ऑपरेटरमार्फत केले जाणार आहे.
प्रतिदिन १६० किलोमीटरचे रस्ते यांत्रिकी झाडूने झाडण्याचे नियोजन आहे. पूर्व व पश्चिम विभागात आउट सोर्सिंगच्या माध्यमातून रस्ते झाडलोट होते.
त्यासाठी तीन वर्षासाठी ७५ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. घंटागाडीवर पाच वर्षात जवळपास साडेतीनशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.