इंदिरानगर : लाखो भाविकांच्या उपस्थितीत पाथर्डी भागात पार पडलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेनंतर आता या सुमारे ६० ते ७० एकर मैदानाची स्वच्छता तातडीने करण्याचे आव्हान संयोजकांपुढे आहे.
त्यात आज थोडा पाऊस पडल्याने विशेषतः ज्या भागात चारशेपेक्षा अधिक संख्येने शौच कुपिका ठेवण्यात आलेल्या होत्या त्या भागात मोठी दुर्गंधी पसरल्याने तातडीने येथील स्वच्छता करून संपूर्ण परिसर निर्जंतुक करण्याची मागणी आसपास राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे. (Maha Shiv Puran Katha Clean ground Demand due to health issue of local citizens nashik)
या भागात आज फेरफटका मारल्यानंतर नागरिकांची मागणी रास्तच आहे. इंदिरानगर भागातील माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे यांच्याकडे येथील पाणीव्यवस्था होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संकेत खोडे आणि सदस्यांनी दररोज ३५ टँकरद्वारे दोन लाख लिटर पाण्याचा बंदोबस्त केल्याने येथील परिस्थिती आटोक्यात राहिली.
मैदानाच्या इतर भागात अस्वच्छता झाली असून, येथील रहिवाशांना आता मोठ्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. हीच परिस्थिती पाथर्डी गावच्या बाजूला असणाऱ्या शौच कुपिकांच्या आसपास देखील आहे.
या भागात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न असल्याने येथील सफाई योग्यरीतीने आणि युद्धपातळीवर व या भागात फवारणी करण्याची मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मंडपाच्या इतर भागातील स्वच्छता आज युद्धपातळीवर सुरू होती. डाळ, साखर, तांदूळ, तेलाचे डबे जळगाव येथे ५ डिसेंबरपासून होणाऱ्या कथा कार्यक्रमासाठी पाठविण्यात येणार असल्याचे समजते.
"दररोज पहाटे चारपासून रात्री दीडपर्यंत सलग पाणीपुरवठा सुरळीत ठेवला. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न आला नाही. मात्र तरीदेखील अस्वच्छता ही समस्या आहे, हे मान्य करावे लागेल. त्या दृष्टीने समन्वय साधून संपूर्ण परिसर स्वच्छ आणि निर्जंतुक करण्यासाठी प्रयत्न करत आहे."
- चंद्रकांत खोडे, पाणी समिती अध्यक्ष
"आनंददायी कार्यक्रम पार पडल्याचे समाधान आहे. स्वच्छतागृह दूर असले तरी सभोवताली अशी परिस्थिती होईल, हे अपेक्षित होते. मात्र संयोजन समितीने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने त्वरित या भागातील सफाई करणे आवश्यक आहे."
-तानाजी गवळी, पाथर्डी ग्रामस्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.