'Maha' Vitaran became 'low' Vitaran Due to load shedding Nashik News esakal
नाशिक

MSEDCL | भारनियमनामुळे ‘महा’ वितरण बनले ‘अल्प’ वितरण

घनश्याम अहिरे : सकाळ वृत्तसेवा

मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : ग्रामीण भागात अतिरिक्त भारनियमनाने (load shedding) वीज ग्राहक वैतागले आहेत. रब्बी पिकांच्या काढणीची लगबग असताना रणरणत्या उन्हात विजेची वाट पाहत शेतकरी (Farmers) आणि लघु उद्योग घटक अक्षरशः वैतागला आहेत. दिवसरात्र गावात अन्‌ माळरानावर ‘वनी रे वनी, गई रे गई’ या आरोळया विज भारनियमनाचे वैतागचित्र कथन करत आहे.

कोरोनानंतर (Corona) पूर्वपदावर येत असलेल्या लघुउद्योग जगतामुळे वाढलेली वीज मागणी, राज्यभर वीज निर्मितीत इंधन तुटवडा या कारणांमुळे वीज खंडीतचे प्रमाण वाढले आहे. महावितरणने (MSEDCL) भारनियमनाचे सुधारित वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. नियमित भारनियमन आणि वीज संसाधनांच्या बिघाडीत दुरुस्तीमुळे होणाऱ्या अतिरिक्त भारनियमनामुळे ग्राहक अक्षरशः वैतागला आहेत. ग्रामीण भागात वीज ग्राहक आणि वीज कर्मचारी यांच्यात खटके उडत आहेत. एकीकडे शेती जगवण्यासाठी निसर्गाशी लढत असताना विजेच्या सुलतानी संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. वीज गायब होण्याचे प्रमाण वाढल्याने ग्रामीण भागातील सर्वच ग्राहक हैराण झाले आहेत. गहू काढणीचा अंतिम काळ, उन्हाळ्यातील वाढत्या तापमानात कांदा पिकाला जगवण्यासाठी धडपड, फळबाग व भाजीपाला पिकांसाठी नियमित किटकनाशक फवारणी करताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. भारनियमनामुळे ग्रामीण पुरवठा योजना प्रभावित झाल्या असून, रोटेशनमध्ये वाढ झाली आहे.

विजेअभावी मजुरीचा भार

शेतमजुरांची जुळवाजुळव, शेतीचे काम पूर्ण करण्याची लगबग, उभे पीक जगविण्याची कसरत सुरू असताना वीज खंडीतचे वाढते प्रमाण सगळ्यांना वैताग देत आहे. मजुरांना विजेअभावी अक्षरशः बसून रोजगार द्यावा लागत आहे. वीज पुरवठा चालू- बंद होताच माळरानावर ‘वनी रे वनी, गई रे गई’च्या आरोळया वैतागाचे चित्र स्पष्ट करत आहेत. शेतकऱ्यांनी शेती धंदा करायलाच नको असेच सरकारी धोरण असल्याची टीका होत आहे.

हिवाळ्यात रात्रीचा तर उन्हाळ्यात दिवसा वीजपुरवठा देण्यामागील उद्देश शेती उद्योगातून शेतकरी हद्दपार करण्याचा प्रकार तर नाही ना, अशी टीका होत आहे. उत्पादन खर्चात जबरदस्त वाढ, शेतमालाचे कोसळते दर आणि वीज समस्या यामुळे शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जात आहे. विजेचा प्रश्‍न बिकट बनत असून, ‘महा’वितरण आता ‘अल्प’वितरण बनले आहे. वीज समस्यांशी तोंड देणाऱ्या ग्राहकांचा पारा चढला आहे. या संघर्षात ग्राहकांशी थेट संबंध येणारा वीज कर्मचारी ‘बळीचा बकरा’ बनतो आहे.

"भारनियमन वेळापत्रक ठरवताना विजेच्या ग्राहकांपैकी शेतकऱ्यांनाच सापत्न वागणूक मिळते. उन्हाळ्यात दिवसा तर हिवाळ्यात रात्री वीज मिळते. ग्राहक म्हणून हा अन्याय नाही का?"

- मोहन मानकर, फळबाग उत्पादक, दाभाडी

"विजेची मागणी व तुटवडा तसेच, भारनियमन यात समन्वय साधने कसरत बनली आहे. वीज ग्राहकांशी थेट संपर्कात येणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे."

- सावित्रा भांगे, कनिष्ठ अभियंता, महावितरण, दाभाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT