mahadev jankar viral video esakal
नाशिक

भगवी शाल घालून महादेव जानकरांचा अंकाई किल्ल्यावर मुक्काम?

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : अंगावर भगवी शाल....मनमाडच्या अंकाई किल्ल्यावर मुक्तपणे संचार करतानाचा माजी मंत्री महादेव जानकारांचा (mahadev jankar) एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. मात्र अचानक आणि गुपचूप ते या किल्ल्यावर दोन दिवस का थांबले? त्यांच्या मनात काय असावं? असे अनेक प्रश्न याबाबत निर्माण होत आहेत. कारण महादेव जानकर यांनी त्यांच्या या मुक्कामाबाबत गुप्तता पाळली होती. (Mahadev-Jankar-secret-stay-at Ankai-fort-Manmad-nashik-marathi-news)

महादेव जानकरांचा मनमाडच्या अंकाई किल्यावर गुपचुप मुक्काम?

माजी मंत्री महादेव जानकर यांनी मनमाडमध्ये असलेल्या अंकाई किल्ल्यावरील अगस्तीमुनींच्या आश्रमात 2 दिवस मुक्काम केला असे समजते. यावेळी त्यांनी किल्ल्यावर असलेले ऋषी अगस्तीमुनींच्या मंदिर आणि मोठे बाबाच्या दरगाह या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले. तसेच त्यांनी किल्ल्यावरील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतला. शिवाय महंत ज्ञानगिरी बाबा यांच्यासोबत मनसोक्तपणे गप्पा मारून किल्ल्याची माहिती जाणून घेतल्याचीही माहिती मिळत आहे. मात्र यावेळी जानकरांनी मीडिया आणि लोकांना देखील भेटण्याचे टाळले. याबाबत अनेकांना प्रश्न निर्माण होत आहेत.

आता अंकाई किल्ल्यावरचा त्यांचा व्हिडीओ समोर

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दुग्धविकास मंत्रिपद भुषवले. पण सत्तेतून पायउतार झाल्यानंतर महादेव जानकर हे मीडियापासून दोन हात दूर राहत आहे. त्यानंतर महादेव जानकर हे भाजपच्या आंदोलनात सहभागी होताना दिसले. अलीकडेच पंकजा मुंडे यांच्यासोबत ते भगवानगडावर हजर होते. त्यानंतर आता अंकाई किल्ल्यावरचा त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates live : लाडक्या बहिणींना आता महिन्याला 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT